‘जितो’च्या अध्यक्षपदी मोतीलाल ओसवाल
By Admin | Updated: September 29, 2016 23:18 IST2016-09-29T23:18:47+5:302016-09-29T23:18:47+5:30
जितो या जागतिक शिखर संघटनेच्या गुरुवारी झालेल्या निवडणुकीत गुंतवणूक सल्लागार मोतीलाल ओसवाल यांची अध्यक्षपदी निवड झाली.

‘जितो’च्या अध्यक्षपदी मोतीलाल ओसवाल
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 29 : जैन इंटरनॅशनल ट्रेड आॅर्गनायझेशन (जितो) या जागतिक शिखर संघटनेच्या गुरुवारी झालेल्या निवडणुकीत सुप्रसिद्ध गुंतवणूक सल्लागार मोतीलाल ओसवाल यांची अध्यक्षपदी, तर प्रेसिडेंटपदी शांतीलाल कवाड यांची निवड झाली.
‘जितो’ ही जगभरातील जैन उद्योजक आणि उद्योगपतींची, तसेच ज्ञानसाधकांची संघटना आहे. सामाजिक- आर्थिक उन्नती, तसेच याबाबतीत सबलीकरण, मूल्याधिष्ठित शिक्षण या क्षेत्रांत काम करणाऱ्या या संघटनेची धुरा आता ओसवाल वाहणार आहेत. ओसवाल आणि कवाड दोघे मिळून संघटनेची कार्यकारिणी निश्चित करतील.
संपत्ती आणि मालमत्तांचे व्यवस्थापन, रोखे व शेअर बाजारातील गुंतवणूक, तसेच गृहकर्जाच्या व्यवस्थापन क्षेत्रात गेल्या ३० वर्षांत नावलौकीक मिळविलेल्या ओसवाल यांच्याकडे ‘जितो’चे अध्यक्षपद आल्याने उद्योग-व्यवसायातील सहकार्याच्या बरोबरीने जागतिक स्नेहभाव आणि आध्यत्मिक उन्नती या बाबतीतही नवा आयाम मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.