सुपारी देऊन केला आईचा खून
By Admin | Updated: June 2, 2016 02:44 IST2016-06-02T02:44:42+5:302016-06-02T02:44:42+5:30
सहा दिवसांपासून चोरट्याने केलेला खून म्हणून बोभाटा झालेल्या प्रणिता पेन्सलवार खून प्रकरणाचे गूढ अखेर रहस्यमयरित्या उकलले आहे. वाह्यात मुलाला शिस्त लावण्यासाठी वारंवार

सुपारी देऊन केला आईचा खून
पेन्सलवार हत्या प्रकरण : शिस्तीसाठी रागावल्याचा राग आल्याने रचला कट
लातूर/ उदगीर : सहा दिवसांपासून चोरट्याने केलेला खून म्हणून बोभाटा झालेल्या प्रणिता पेन्सलवार खून प्रकरणाचे गूढ अखेर रहस्यमयरित्या उकलले आहे. वाह्यात मुलाला शिस्त लावण्यासाठी वारंवार रागावल्यामुळे प्रणिता यांच्या १५ वर्षीय मुलानेच त्यांचा चक्क सुपारी देऊन खून केल्याचे उघडकीस आले आहे.
लखन शिवाजी इबेदार (१८), शुभम मस्के (२०), वाजिद जिलानी शेख (२०), नदीम ताहेर (१९), विजय नागोराव इबेदार (२० सर्व रा. पालम, जि. परभणी), अशी आरोपींची नावे असून यापैकी शुभम आणि नदीम यांना अटक करण्यात आली आहे, तर अन्य तिघे फरार आहेत. अल्पवयीन मुलगाही पोलिसांच्या ताब्यात असल्याचेही ते म्हणाले.
२६ मे रोजी उदगीरच्या शेल्हाळ रोडवरील प्रणिता प्रशांत पेन्सलवार यांच्या निवासस्थानी भरदुपारी घुसून तिघांनी त्यांची गळा चिरून हत्या केली होती. या घटनेचा एकमेव साक्षीदार असलेल्या किरकोळ जखमी मुलाने याबाबत फिर्याद दिली होती. त्यात एसी दुरुस्त करण्याच्या बहाण्याने घरात घुसलेल्या तीन चोरट्यांनी खून करून सोने लुटल्याचे म्हटले होते.
मुलगा ‘ज्वेलर्स दुकानाच्या तिजोरीतून पैसे परस्पर नेतो’, ‘त्याची संगत चांगली नाही’, म्हणून प्रणिता मुलाला रागावत असत. आईच्या या शिस्तीचा राग आल्याने तिचा काटा काढण्यासाठी मुलाने आपल्या मित्रांना ही सुपारी दिली होती. (प्रतिनिधी)