मातृभूमीच्या सन्मानाला मोल नसते - सरसंघचालक
By Admin | Updated: September 8, 2015 01:03 IST2015-09-08T01:03:18+5:302015-09-08T01:03:18+5:30
आपल्या मातेने सांगितलेल्या कामाचा मोबदला आपण मागत नाही, तसाच मातृभूमीच्या सन्मानासाठी केलेला त्यागसुद्धा अनमोल असतो. त्याचे मूल्य मागता येत नाही, असे मत राष्ट्रीय

मातृभूमीच्या सन्मानाला मोल नसते - सरसंघचालक
नागपूर : आपल्या मातेने सांगितलेल्या कामाचा मोबदला आपण मागत नाही, तसाच मातृभूमीच्या सन्मानासाठी केलेला त्यागसुद्धा अनमोल असतो. त्याचे मूल्य मागता येत नाही, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. माजी सैनिकांनी
‘वन रॅँक वन पेन्शन’साठी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
प्रहार मिलिटरी स्कूलतर्फे १९६५च्या भारत-पाक
युद्धातील शौर्याची पताका फडकविणाऱ्या सैन्य अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार कार्यक्रमाला मोहन भागवत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ग्रुप कॅप्टन एस.व्ही. फाटक, कर्नल विष्णू वडोदकर व कर्नल सुनील देशपांडे यांचा भागवत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या वेळी त्यांनी १९६२पासून आजपर्यंत झालेल्या युद्धांत शहीद झालेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्याची भूमिका व्यक्त केली.