13 वर्षाच्या बालिकेवर लादले मातृत्व !

By Admin | Updated: August 21, 2014 01:22 IST2014-08-21T01:22:13+5:302014-08-21T01:22:13+5:30

महिला आणि मुलींवरील अत्याचाराबद्दल सर्वत्र ओरड होत असताना चंद्रपुरात बुधवारी सकाळी अवघ्या तेराव्या वर्षाची बालिका प्रसूत झाली.

Motherhood imposed on 13-year-old child! | 13 वर्षाच्या बालिकेवर लादले मातृत्व !

13 वर्षाच्या बालिकेवर लादले मातृत्व !

चंद्रपूर : महिला आणि मुलींवरील अत्याचाराबद्दल सर्वत्र ओरड होत असताना चंद्रपुरात बुधवारी सकाळी अवघ्या तेराव्या वर्षाची बालिका प्रसूत झाली. खेळण्या बागडण्याच्या वयात तिच्यावर मातृत्वाचे ओङो लादणा:या नराधमाबद्दल अद्याप माहिती उपलब्ध नाही, अथवा तशा स्वरूपाची तक्रारही तिच्या पालकांकडून झालेली नसल्याने पोलीस अधिक तपास करीत आहेत़ प्रसूतीपासूनच बालिका बेशुद्ध आहे. नवजात बाळाचीही प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय अधिका:यांनी सांगितल़े
सिंदेवाही तालुक्यातील एका गावातील बालिकेवर ही आपत्ती कोसळली़ गावालगतच्या जिल्हा परिषद शाळेत सातव्या वर्गात शिकणारी ही बालिका दीड महिन्यापासून आजारी होती. तिला मोहाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केल्यानंतर तिच्या शरीरात हिमोग्लोबीन आणि रक्त कमी असल्याचे सांगून मूल अथवा चंद्रपूरला उपचार घेण्याबद्दल डॉक्टरांनी सुचविले होते. दरम्यान, 18 ऑगस्टला सायंकाळी तिला बेशुद्धावस्थेतच मूलच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. तेथून चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. तपासणी केली असता तिच्या पोटात नऊ महिन्यांचा गर्भ असल्याचे निदान डॉक्टरांनी केले. बुधवारी पहाटे ती प्रसूत झाली. तेव्हापासून ती बेशुद्धावस्थेतच आहे. या प्रकरणी रूग्णालयाच्या बा रूग्ण विभागाने रूग्णालयातील पोलीस चौकीला तक्रार दाखल केली आहे. तिच्या वडिलांचा जबाब नोंदविण्यात आला असून, बालिका शुद्धीवर आल्यावर तिचाही जबाब नोंदविला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितल़े पीडित बालिकेचे आईवडील शेतमजुरी करतात. (जिल्हा प्रतिनिधी)

 

Web Title: Motherhood imposed on 13-year-old child!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.