नागपूरच्या दुधाला ‘मदर टच’

By Admin | Updated: September 15, 2016 04:06 IST2016-09-15T04:06:51+5:302016-09-15T04:06:51+5:30

दुरवस्थेत असलेला नागपूरचा शासकीय दूध प्रकल्प आता राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ (एनडीडीबी) संचलित मदर डेअरी फ्रुट अँड व्हेजिटेबल कंपनीकडे हस्तांतरित करण्याचा सामंजस्य करार

Mother Touches to Milk Milk | नागपूरच्या दुधाला ‘मदर टच’

नागपूरच्या दुधाला ‘मदर टच’

मुंबई : दुरवस्थेत असलेला नागपूरचा शासकीय दूध प्रकल्प आता राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ (एनडीडीबी) संचलित मदर डेअरी फ्रुट अँड व्हेजिटेबल कंपनीकडे हस्तांतरित करण्याचा सामंजस्य करार आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. विदर्भ व मराठवाड्यातील दूध उत्पादन वाढीसाठीचे प्रयत्न तसेच त्या भागातील उत्पादित दुधाचे संकलन व प्रक्रिया आणि विक्रीचे काम आता मदर डेअरी करेल. दोन हजार गावांतील ६० हजार कुटुंबांना फायदा होणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
नागपुरातील दुग्धव्यवसाय आयुक्तांच्या अखत्यारीतील २१.८६ एकर जमिनीपैकी ९.८८ एकर जमीन त्यावरील दुग्धशाळेची इमारत, गोदाम, बॉयलर, दूधभुकटी प्रकल्प, ट्रक टर्मिनल तसेच यंत्रसामग्री ३० वर्षांसाठी नाममात्र भाडेतत्वावर ‘मदर डेअरी फ्रुट अँड व्हेजिटेबल’ कंपनीला देण्यात आले आहे. एनडीडीबीतर्फे दोन्ही भागांमध्ये दुग्धविकासाचे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. यवतमाळ जिल्हा दूध संघ अलिकडेच ‘अमूल’कडे हस्तांतरित करण्यात आला आहे.
या सामंजस्य करारावर राज्य शासनातर्फे नागपूरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे व राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ संचलीत मदर डेअरी फ्रुट अँड व्हेजिटेबल प्रा. लि. कंपनीचे कार्यकारी संचालक एस.नागराजन यांनी स्वाक्षरी केल्या. यावेळी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री महादेव जानकर, राज्ळमंत्री अर्जून खोतकर, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय आणि वरिष्ठ अधिकारी तसेच नागपूरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Mother Touches to Milk Milk