आई, आजीची हत्या करून दत्तक पुत्राची आत्महत्या

By Admin | Updated: April 27, 2017 02:09 IST2017-04-27T02:09:32+5:302017-04-27T02:09:32+5:30

आईसह आजीची हत्या करून दत्तक पुत्राने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी सकाळी अंधेरी भागात घडली.

Mother, suicide committed by adoptive son by killing her | आई, आजीची हत्या करून दत्तक पुत्राची आत्महत्या

आई, आजीची हत्या करून दत्तक पुत्राची आत्महत्या

मुंबई : आईसह आजीची हत्या करून दत्तक पुत्राने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी सकाळी अंधेरी भागात घडली. समीर खान (३३), आई मीनाताई (५५), आजी फातिमा शेख (७५) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवले आहेत.
अंधेरी पश्चिमेकडील इंदिरानगर परिसरातील संक्रमण शिबिरात खोली क्रमांक ३५मध्ये सहा महिन्यांपासून समीर त्याची आई मीनाताई आणि आजी फातिमा यांच्यासोबत राहात होता. जीवननगर परिसरात त्याचा धाबा आहे. मीनातार्इंनी समीरला दत्तक घेऊन लहानपणापासून त्याचा सांभाळ केला होता.
आई, आजीची गळा आवळून हत्या केल्यानंतर समीरने गळफास घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेली कोणतीही चिठ्ठी पोलिसांना सापडलेली नाही. त्यामुळे यामागील नेमके कारण समजू शकले नाही. गेल्या काही दिवसांपासून समीरच्या घरात धुसफुस सुरू होती. त्यांचे कुटुंब कुणाशीही बोलत नसे, असे शेजारच्यांचे म्हणणे आहे. मालमत्तेच्या वादातून हा प्रकार घडल्याचाही एक तर्क काढण्यात येत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Mother, suicide committed by adoptive son by killing her