आईने मुलीला ३० हजारांना विकले
By Admin | Updated: November 15, 2016 05:45 IST2016-11-15T05:45:29+5:302016-11-15T05:45:29+5:30
झिक्री येथील महिलेने आपल्या अल्पवयीन मुलीला नातेवाईकांच्या मदतीने वेश्या व्यवसायासाठी गुजरातमध्ये ३० हजारांना विकल्याची फिर्याद मुलीच्या

आईने मुलीला ३० हजारांना विकले
जामखेड (अहमदनगर) : झिक्री येथील महिलेने आपल्या अल्पवयीन मुलीला नातेवाईकांच्या मदतीने वेश्या व्यवसायासाठी गुजरातमध्ये ३० हजारांना विकल्याची फिर्याद मुलीच्या वडिलांनी जामखेड पोलिसांत सोमवारी सायंकाळी दिली.
पोलिसांनी मुलीच्या आईसह सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. प्रभू तुकाराम गायकवाड यांनी फिर्याद दाखल केली आहे. पत्नी, तीन मुली व एक मुलगा यासह गायकवाड झिक्री गावात राहतात. त्यांची पत्नी मुलांसह माहेरी तेलंगसी (ता. जामखेड) येथे जाते म्हणून झिक्री येथे गेली होती. सोमवारी रात्री मुलीच्या शोधास पोलिसांचे पथक पुणे जिल्ह्यातील शिरूरला रवाना झाले. (प्रतिनिधी)