सासरच्यांचा राग मुलींवर काढला, २ मुलींची हत्या करून आईचा आत्महत्येचा प्रयत्न

By Admin | Updated: November 22, 2015 18:48 IST2015-11-22T18:47:57+5:302015-11-22T18:48:12+5:30

सासरच्या मंडळींशी झालेल्या भांडणाच्या रागातून एका महिलेने पोटच्या दोन मुलींची हत्या करून स्वत: आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना सोलापूरमध्ये घडली आहे

Mother made an attempt to suicide, killing two girls and attempting to commit suicide | सासरच्यांचा राग मुलींवर काढला, २ मुलींची हत्या करून आईचा आत्महत्येचा प्रयत्न

सासरच्यांचा राग मुलींवर काढला, २ मुलींची हत्या करून आईचा आत्महत्येचा प्रयत्न

>ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. २२ - सासरच्या मंडळींशी झालेल्या भांडणाच्या रागातून एका महिलेने पोटच्या दोन मुलींची हत्या करून स्वत: आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना सोलापूरमध्ये घडली आहे. रविवारी सकाळीच हा प्रकार घडला.
सोलापूरच्या बसवनगरमधील एका घरात दोन लहान मुलींचे मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली होती, तर त्या मुलींची आईही गंभीर जखमी अवस्थेत आढळली. उपाचारांसाठी तिला तातडीने शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. प्रथमदर्शनी हा प्रकार म्हणजे कोणीतरी त्यांच्यावर हल्ला केल्याचा वाटत होता. मात्र त्या महिलेनेच आपल्या मुलींची हत्या करून स्वत:चे जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला भारती हिच्या पतीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाल्यानंतर ती दोन मुलींसह दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या बसवनगर गावात ती सासरी राहत होती. दोन-चार दिवसांपूर्वी भारतीचे तिच्या सासूसोबत भांडण झाले आणि त्या रागातूनच भारतीने मुलींना मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. दरम्यान याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. 
 

Web Title: Mother made an attempt to suicide, killing two girls and attempting to commit suicide