शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

आईनं सोडलं दोन महिन्याचं तान्हुलं, अन् खाकी वर्दीतील मायेला फुटला पाझर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 15:16 IST

ज्याला कोणी नाही त्याला पोलीस आहे़़़हृदयद्रावक प्रसंगाची पंढरपुरात चर्चा 

ठळक मुद्देइथंही खाकी वर्दीनं त्याची इमानेइतबारे शुश्रूषा करून मायेचा आधार दिलाहृदयद्रावक प्रसंगाची पंढरपुरात दिवसभर चर्चा सुरू झालीत्या चिमुकलीला नवरंगे बालकाश्रमात दाखल

सचिन कांबळे 

पंढरपूर : दोन महिन्यांचं तान्हुलं.. मातेनं सोडून दिलं.. त्याला जणू परक्याचा स्पर्श जाणवला अन् हुंदके देत रडू लागलं.. त्या परक्यांनाही काय करावं कळेना..अखेर तान्हुलं थेट पोलीस ठाण्यात पोहोचलं..इथंही खाकी वर्दीनं त्याची इमानेइतबारे शुश्रूषा करून मायेचा आधार दिला. गुरुवारी दुपारी घडलेल्या या हृदयद्रावक प्रसंगाची पंढरपुरात दिवसभर चर्चा सुरू झाली.

शहरातील चौफाळा चौकातील कृष्णाच्या मंदिराजवळ दुपारच्या वेळेस एक अज्ञात महिला दोन महिन्यांच्या चिमुकलीला घेऊन बराच वेळ बसली होती. त्याठिकाणी असलेल्या सचिन व्यवहारे, मनोज वाडेकर व धैर्यशील काळे यांना मी लघुशंका करायला जाऊन येते, तोपर्यंत या मुलीला सांभाळा, असे म्हणून त्या तेथून निघून गेल्या. त्यानंतर अर्धा तास, एक तास झाला तरी ती महिला लहान मुलीला घेण्यास आली नाही. यामुळे वरील तिघांनी त्या चिमुकल्या बाळास पोलिसांच्या स्वाधीन केले. त्या ठिकाणी त्या मुलीस पोलीस कॉन्स्टेबल सोनाली इंगोले, पौर्णिमा हादगे, प्रियांका मोहिते यांनी नवे कपडे घालून बाटलीद्वारे दूध पाजून शांत केले़ त्यानंतर सर्वच पोलीस त्या बाळाला खेळवू लागले़ या हृदयद्रावक घटनेनंतर ज्याला कोणी नाही त्याला पोलीस आहे, असा संदेश जनमानसात गेल्याचे दिसून आले.

शहर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात महिलेविरुद्ध सरकारतर्फे ३१७ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर त्या चिमुकलीला नवरंगे बालकाश्रमात दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी दिली.

बाटलीतलं दूध पिताच तान्हुलं हसलंगंभीर प्रसंग असताना पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तान्हूल्याला जेव्हा महिला कॉन्स्टेबर सोनाली इंगोले, पौर्णिमा हादगे, प्रियंका मोहिते यांनी अलगदपणे हाती घेऊन मायेचा हात फिरवला. बाटलीद्वारे दूध पाजलं. तेव्हा कुठे मलूल चेहºयानं रडून लालबूंध झालेल्या तान्हूल्याच्या चेहºयावर हासू विलसंल. हृदय पिळवटून टाकणाºया या प्रसंगातही क्षणभर साºयांच्या चेहºयावर समाधानाची लकेर दिसली.

टॅग्स :SolapurसोलापूरPoliceपोलिसPandharpurपंढरपूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस