समलैंगिक वरासाठी आईने दिली जाहिरात
By Admin | Updated: May 21, 2015 16:37 IST2015-05-21T16:37:09+5:302015-05-21T16:37:09+5:30
आपला मुलाचे वय ३६ वर्ष असून त्याकरता २५ ते ४० पर्यंत वयाचे वर शोधत असल्याची जाहिरात एका वर्तमानपत्रात दिली होती.

समलैंगिक वरासाठी आईने दिली जाहिरात
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - समलैंगिक वरासाठी पद्मा अय्यर या महिलेने आपल्या मुलासाठी वर शोधण्याची जाहिरात दिली होती.
त्यात त्यांनी आपला मुलाचे वय ३६ वर्ष असून त्याकरता २५ ते ४० पर्यंत वयाचे वर शोधत असल्याची जाहिरात एका वर्तमानपत्रात दिली होती. या जाहिरातीमध्ये पद्मा अय्यर यांनी वर शाकाहारी व अय्यरच असावा अशी अट घातली आहे. त्यांच्या या अटीवर काहीलोकांनी टीकेची झोड उठवत दलित, मुस्लिम किंवा इतर धर्मिय का नको असे प्रश्न विचारणारे ईमेल्सही आल्याचे हरीश यांनी सांगितले. याबाबत हरीशला विचारले असता गेली अनेक वर्ष मी एकटा असून मला कुणाचीतरी सोबत हवी असून आईने माझ्यासाठी वर शोधण्यास सुरवात केली. ही जाहिरात प्रसिद्ध करण्यास अनेक वर्तमानपत्रांनी नकार दिला असल्याचेही हरीशने सांगितले असून तो स्वतः एका समलैंगिकांसाठी असलेल्या संस्थेत काम करतो.