आई ओरडली म्हणून तरुणाची आत्महत्या
By Admin | Updated: March 15, 2017 04:14 IST2017-03-15T04:14:31+5:302017-03-15T04:14:31+5:30
धुळवड खेळून रात्री उशिराने मुलगा घरी आला म्हणून आई ओरडली. मात्र आईचे ओरडणे सहन न झाल्याने २४ वर्षांच्या तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री पवईत घडली.

आई ओरडली म्हणून तरुणाची आत्महत्या
मुंबई : धुळवड खेळून रात्री उशिराने मुलगा घरी आला म्हणून आई ओरडली. मात्र आईचे ओरडणे सहन न झाल्याने २४ वर्षांच्या तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री पवईत घडली. श्रीकांत मलकारी (२४) असे या तरुणाचे नाव असून, पवई पोलीस यासंदर्भात तपास करीत आहेत.
पवई येथील इंदिरानगर परिसरात मलकारी कुटुंबीयांसोबत राहतो. सोमवारी धुळवडीचा आनंद लुटून तो रात्री उशिराने घरी परतल्याने आई त्याला ओरडली. यातूनच घरातील मंडळी झोपली असताना त्याने गळफास घेत आत्महत्या केली. दरम्यान, त्याच्याकडे गेलेल्या नातेवाइकाला तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. याबाबत पवई पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा त्यापूर्वीच मृत्यू झाला होता. या घटनेमुळे मलकारी कुटुंबीयांना धक्का बसला आहे. मात्र यामागे आणखी काही कारण आहे का? याचा शोध पोलीस घेत आहेत. (प्रतिनिधी)