तीन मुलांना विष पाजून आईची आत्महत्या

By Admin | Updated: January 17, 2016 02:23 IST2016-01-17T02:23:29+5:302016-01-17T02:23:29+5:30

लग्नाला जाण्यावरून झालेल्या वादात निवृत्त सैनिकाच्या पत्नीने पोटच्या मुलीसह दोन मुलांना विष पाजून गळफास घेऊन आत्महत्या केली. येथील मियांभाई कॉलनीत हा प्रकार घडला.

Mother committed suicide by feeding three children | तीन मुलांना विष पाजून आईची आत्महत्या

तीन मुलांना विष पाजून आईची आत्महत्या

अंबाजोगाई (बीड) : लग्नाला जाण्यावरून झालेल्या वादात निवृत्त सैनिकाच्या पत्नीने पोटच्या मुलीसह दोन मुलांना विष पाजून गळफास घेऊन आत्महत्या केली. येथील मियांभाई कॉलनीत हा प्रकार घडला.
नूरजहाँ शेख फतरू (३८) व त्यांचे पती निवृत्त सैनिक शेख फतरू शेख रज्जाक या दोघांच्याही नातेवाईकांकडे सोमवारी एकाच दिवशी लग्नसोहळा होता. नेमके कोणाच्या लग्नाला जायचे? यावरून दोघांत शुक्रवारी रात्री कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर बँकेत सुरक्षा रक्षक असलेले शेख फतरू रात्रपाळीसाठी कामावर गेले. शनिवारी पहाटे रागाच्या भरात नूरजहाँ यांनी मुलगी नेहा शेख फतरू (१४), मुलगा तोहित शेख फतरू (९), अफान शेख फतरू (४) यांना विष पाजून स्वत: गळफास घेतला.
शेख फतरू सकाळी कामावरून आल्यानंतर कोणीही घराचे दार उघडत नसल्याने त्यांनी शेजारच्यांच्या मदतीने दार उघडले. तेव्हा पत्नीसह तीनही मुलांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. (प्रतिनिधी)

विवाहितेचे नातेवाईक संतप्त
घटनेनंतर नूरजहाँ यांच्या नातेवाईकांनी शेख फतरू यांच्या भावास मारहाण केली. ते गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला.
माहेरी अंत्यसंस्कार नूरजहाँ यांच्या माहेरच्या मंडळींनी चौघांवरही परळीत अंत्यसंस्कार केले.

Web Title: Mother committed suicide by feeding three children