कलबुर्गी येथे आई व मुलीची हत्या
By Admin | Updated: June 21, 2016 16:52 IST2016-06-21T16:39:32+5:302016-06-21T16:52:54+5:30
कलबुर्गी येथील डबराबादच्या एम.एम.कृष्णा कॉलनीत आई व मुलींची निर्घृण हत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली़.

कलबुर्गी येथे आई व मुलीची हत्या
>ऑनलाइन लोकमत
सोलापूर/ कलबुरगी, दि. २१ - कलबुर्गी येथील डबराबादच्या एम.एम.कृष्णा कॉलनीत आई व मुलींची निर्घृण हत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली़ असून हत्येमागील ठोस कारण अद्याप समजू शकले नाही. यल्लम्मा कृष्णय्या (वय ४०) व त्यांची मुलगी आशा कृष्णय्या (वय १६) अशी मृतांची नावे असून यल्लम्मा हिच्या डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली तर मुलगी आशा हिला चाकूने भोसकून मारण्यात आल्याचे पोलीसांनी सांगितले. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा खून झाल्याचे समजते. या घटनेची नोंद कलबुरगी ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
हत्येचे वृत्त समजताच जिल्हा पोलीस अधिक्षक एऩ शशीकुमार, पोलीस उपअधिक्षक वाजिद पटेल, पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर तिगडी यांनी घटनास्थळाला भेट दिली़. दरम्यान या हत्येनंतरर डबराबाद परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान मारेकरी अद्याप पोलीसांच्या हाती लागलेले नाहीत.