वडिलांपाठोपाठ आईचीही आत्महत्या, २ चिमुकल्या झाल्या पोरक्या
By Admin | Updated: June 28, 2016 13:46 IST2016-06-28T13:42:39+5:302016-06-28T13:46:12+5:30
कर्जाच्या वाढत्या बोजामुळे पतीने आत्महत्या केल्यानंतर चारच दिवसात पत्नीनेही आत्महत्या केल्याने त्यांच्या दोन मुली पोरक्या झाल्या आहेत.

वडिलांपाठोपाठ आईचीही आत्महत्या, २ चिमुकल्या झाल्या पोरक्या
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
उस्मानाबाद, दि. २८ - डोक्यावरील कर्जाच्या वाढत्या बोजामुळे पतीने आत्महत्या केल्याला चार दिवस उलटत नाहीत तोच त्याच्या विधवा पत्नीनेही जीवन संपवल्याची धक्कादायक घटना कळंब तालुक्यातील पाडोळी ( नायगाव ) येथे घडली आहे. मात्र वडिलांपाठोपाठ आईचे छत्र हरपल्याने त्यांच्या दोन चिमुकल्या मुली मात्र पोरक्या झाल्या आहेत.
सुप्रिया महेंद्र टेकाळे असे मयत महिलेचे नाव असून पाच दिवसांपूर्वी तिच्या पतीने गळफास लावून आत्महत्या केली. डोक्यावरील कर्जाच्या वाढत्या बोजा मुळे पाडोळी येथील महेंद्र श्रीराम टेकाळे या 35 वर्षीय शेतकऱ्याने 23 रोजी आत्महत्या केली होती. पतीच्या मृत्यमुळे निराश झालेल्या सुप्रिया यांनी मंगळवारी पहाटे जाळून घेत आत्महत्या केली. त्यांना उपचारांसाठी तातडीने लातूरमधील रुग्णालयात दाखल केले, मात्र तेथेच त्यांचा मृत्यू झाला.
वडिलांपाठोपाठ आईच्या मृत्यूने त्यांच्या दोन चिमुकल्या मुली मात्र पोरक्या झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.