वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर माथेफिरूची वाहनांवर दगडफेक, ८ जण जबर जखमी
By Admin | Updated: March 2, 2016 08:32 IST2016-03-02T07:44:52+5:302016-03-02T08:32:44+5:30
वेर्स्टन एक्सप्रेस हायवेवर बुधवारी सकाळी एका माथेफिरू तरूणाने वाहनांवर केलेल्या दगडफेकीत ८ जण जखमी झालेत.

वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर माथेफिरूची वाहनांवर दगडफेक, ८ जण जबर जखमी
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २ - गोरेगाव जवळ वेर्स्टन एक्सप्रेस हायवेवर बुधवारी सकाळी एका माथेफिरू तरूणाने वाहनांवर केलेल्या दगडफेकीत ८ जण जखमी झालेत. तसेच अनेक वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
दगडफेक करण्याऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरी त्याच्याबद्दल सविस्तर माहिती समजू शकलेली नाही, तसचे त्याने हे विध्वसंक कृत्य का केले याचाही छडा लागलेला नाही. मिळालेल्या माहीतीनुसार दगडफेक केलेल्या तरुणचे मानसिक संतुलन ठीक नाही.
दरम्यान या तरुणाच्या दगडफेकीत १२ गाड्यांचे नुकसान झाले आहे. तर वाहन चालकासह ८ जण जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्याला मारहाण झाल्यामुळे डोक्यातून रक्तस्त्राव होत होता.