मोतेवार सोलापूरच्या रुग्णालयात दाखल

By Admin | Published: January 1, 2016 01:39 AM2016-01-01T01:39:15+5:302016-01-01T01:39:15+5:30

‘समृद्ध जीवन’चा सर्वेसर्वा महेश मोतेवार याच्या छातीत दुखत असल्यामुळे उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात गुरुवारी सकाळी दाखल करण्यात आले. त्याला उस्मानाबादहून

Motevar admitted to Solapur hospital | मोतेवार सोलापूरच्या रुग्णालयात दाखल

मोतेवार सोलापूरच्या रुग्णालयात दाखल

googlenewsNext

सोलापूर/ उस्मानाबाद : ‘समृद्ध जीवन’चा सर्वेसर्वा महेश मोतेवार याच्या छातीत दुखत असल्यामुळे उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात गुरुवारी सकाळी दाखल करण्यात आले. त्याला उस्मानाबादहून सोलापूरला आणताना त्याचे चित्रीकरण करणाऱ्या माध्यमांच्या प्रतिनिधींना मोतेवारच्या वाहनचालकाने अरेरावी करीत धक्काबुक्की केली़
उस्मानाबाद गुन्हे शाखेच्या ताब्यात असलेल्या मोतेवारच्या छातीत दुखू लागल्याने बुधवारी रात्री त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ मात्र तेथे हृदयरोगतज्ज्ञ नसल्याने त्याला पुढील उपचारासाठी गुरुवारी सकाळी सोलापूरला नेण्यात आले. सोलापूरमध्ये शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत़
येणेगूर येथील रेवते अ‍ॅग्रोच्या डेअरीतील फसवणूक प्रकरणात साधारणत: दीड ते दोन वर्षे फरार असलेल्या मोतेवारला २८ डिसेंबर रोजी उस्मानाबाद पोलिसांनी पुणे येथे ताब्यात घेतले होते़ त्याला २९ डिसेंबर रोजी उमरगा न्यायालयात हजर केले असतान्यायालयाने त्याला ३१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती़

Web Title: Motevar admitted to Solapur hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.