शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

उभारुन दाखवली; बेकायदा होर्डिंग्स लावण्यात शिवसेना पहिल्या क्रमांकावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 06:38 IST

राज्यभरातील महत्त्वाच्या महापालिकांच्या हद्दीतील बेकायदा होर्डिंग्सची माहिती याचिकाकर्त्यांनी न्यायालयापुढे सादर केली. यामध्ये शिवसेनेची सर्वाधिक बेकायदा होडिग्स लावण्यात आल्याचे निदर्शनास आले.

मुंबई : बेकायदा होर्डिंग्स लावण्यास प्रोत्साहन देऊ नका, संबंधितांवर पक्षांतर्गत कारवाई करा, असे अनेकदा घसा फोडून उच्च न्यायालयाने सांगूनही राजकीय पक्षांनी मात्र त्याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले असल्याची बाब याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयाच्या सोमवारी निदर्शनास आणली. राज्यभरातील महत्त्वाच्या महापालिकांच्या हद्दीतील बेकायदा होर्डिंग्सची माहिती याचिकाकर्त्यांनी न्यायालयापुढे सादर केली. यामध्ये शिवसेनेची सर्वाधिक बेकायदा होडिग्स लावण्यात आल्याचे निदर्शनास आले. सेनेची ४६ तर भाजपची ४० बेकायदा होर्डिंग्स या वर्षात लावण्यात आली आहेत.बेकायदा होर्डिंग्स लावून शहराचे व्रिदुपीकरण करण्यात येते व स्थानिक स्वराज्य संस्थांचा महसूल बुडविण्यात येतो. त्यामुळे बेकायदा होर्डिंग्स हटवण्याचा आदेश संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात यावा, अशी मागणी करणाऱ्या अनेक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. या सर्व याचिकांवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे होती. गेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना राजकीय पक्षांनी लावलेल्या बेकायदा होर्डिंग्सची माहिती सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्या निर्देशाचे पालन करत अ‍ॅड. उदय वारूंजीकर यांनी सोमवारी न्यायालयात यादी सादर केली.अहमदनगर, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, उल्हासनगर, अमरावती,जळगाव, नांदेड, शिर्डी व भिवंडी याठिकाणील बेकायदा होर्डिंगसची यादी याचिकाकर्त्यांनी न्यायालयात सादर केली. या यादीनुसार, या सर्व ठिकाणी मिळून शिवसेनची ४६, भाजप-४०, काँग्रेस-१५, राष्ट्रवादी काँग्रेस-९, मनसे-५ व अन्य पक्षांची मिळून १० बेकायदा होर्डिंग्स या वर्षभरात लावण्यात आली आहेत. उच्च न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी तहकूब केली.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा