देशात सर्वाधिक महाग पेट्रोल मुंबईत

By Admin | Updated: April 23, 2017 12:32 IST2017-04-23T12:32:54+5:302017-04-23T12:32:54+5:30

केंद्र सरकारने पेट्रोलच्या दरात पुन्हा असह्य़ अशी वाढ केल्यामुळे महागाईचा भडका आणखी उडणार आहे

The most expensive petrol in the country, Mumbai | देशात सर्वाधिक महाग पेट्रोल मुंबईत

देशात सर्वाधिक महाग पेट्रोल मुंबईत

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23 - केंद्र सरकारने पेट्रोलच्या दरात पुन्हा असह्य़ अशी वाढ केल्यामुळे महागाईचा भडका आणखी उडणार आहे. कारण, 77.45 रुपये प्रतिलिटर प्रमाणे देशात सर्वात महाग पेट्रोल मुंबईत मिळणार आहे. आता मुंबईकरांना पेट्रोलसाठी प्रति लिटर 77. 45 रुपये खर्च करावे लागणार आहेत. राज्य सरकारने पेट्रोलवर तीन रुपये अधिभार वाढविल्याने शुक्रवार मध्यरात्रीपासून पेट्रोल ३ रुपयांनी महागले. आजपासून पेट्रोलदरात वाढलेल्या जादा दरामुळे नागरिकांवर आणखी बोजा पडला आहे. पुण्यात पेट्रोलचा दर आता 78.2 रुपये प्रतिलिटर तर नागपूरमध्ये प्रति लिटर 77.14 रुपये झाला आहे. राजधानी दिल्लीपेक्षा मुंबईत पेट्रोल दहा रुपयांनी महाग आहे. दिल्लीमध्ये प्रतिलिटर 68.26 रुपये दराने पेट्रोल मिळते.

प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्रात प्रति लिटर पेट्रोलवर 6 रुपये अधिभार लावण्यात येतो. आता राज्य सरकारच्या वित्त मंत्रालयाने अधिभार वाढवून 9 रुपये केला आहे. याचप्रकारे 26 टक्के मूल्यवर्धित कर आणि 9 रुपये अधिभार लावल्यामुळे पेट्रोल तीन रुपयांनी महाग झाले आहे. यापूर्वी 26 टक्के मूल्यवर्धित कर आणि 6 रुपये अधिभार लावला होता. हा अधिभार राज्यात दुष्काळ पडल्यामुळे राज्य सरकारने लावला होता. दुष्काळी भागातील पीडितांच्या आर्थिक मदतीसाठी या रकमेचा उपयोग करण्यात येत होता. दुष्काळी मदत अधिभाराची मुदत 31 मार्च 2017 रोजी संपलेली आहे. सद्यस्थितीत राज्यात दुष्काळी परिस्थिती नाही, त्यानंतरही अधिभाराची वसुली सुरूच आहे. आता सरकारने दुष्काळी मदत हा शब्द हटवून अधिभार वाढविला आहे.

या संबंधीची अधिसूचना राज्य सरकारने शुक्रवारी सायंकाळी जारी केली. त्यामुळे शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच हा निर्णय लागू झाला. नागरिकांना याची कल्पना नसल्याने काही पंपांवर वाद-विवादाचे प्रसंगही उद्भवले

Web Title: The most expensive petrol in the country, Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.