माघवारीसाठी पंढरपुरात तीन लाखांपेक्षा जास्त भाविक दाखल

By Admin | Updated: February 6, 2017 18:56 IST2017-02-06T18:56:10+5:302017-02-06T18:56:10+5:30

माघवारीसाठी पंढरपुरात तीन लाखांपेक्षा जास्त भाविक दाखल

More than three lakh pilgrims filed for Pandharpur on Tuesday | माघवारीसाठी पंढरपुरात तीन लाखांपेक्षा जास्त भाविक दाखल

माघवारीसाठी पंढरपुरात तीन लाखांपेक्षा जास्त भाविक दाखल

माघवारीसाठी पंढरपुरात तीन लाखांपेक्षा जास्त भाविक दाखल
माघ वारी : पत्राशेडपर्यंत भाविकांची रांग
प्रभू पुजारी : पंढरपूर -

सावळ्या विठूरायाच्या भेटीची आस मनी घेऊन माघवारीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तीन लाखांपेक्षा अधिक भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. मंगळवारी माघवारी असून विठूरायाचे दर्शन घेसाठी भाविक आतूर झाले आहेत़ मात्र श्री विठ्ठलाची पदस्पर्श दर्शनरांग गोपाळपूर रस्त्यावरील मंदिर समितीच्या पत्रा शेडच्या पुढे तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात आलेल्या पत्राशेडपर्यंत गेली आहे. दर्शनासाठी भाविकांना सात ते आठ तास लागत आहेत.
माघ वारीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेण्यासाठी एसटी, रेल्वे, खासगी वाहनांनी भाविक मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. त्यामुळे मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीमुळे फुलून गेला आहे़ परिणामी रस्त्यावरून ये-जा करणेही मुश्किल होते. चौक, बोळ, गल्लीच्या ठिकाणीही भाविकांची मोठी गर्दी झाली आहे़ त्यामुळे मुख्य रस्त्याकडे येणाऱ्या गल्लीतील रस्त्यावर लोखंडी खांब उभारण्यात आले आहेत़
सध्या मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा वाळवंट, स्टेशन रस्ता, चौक ही ठिकाणे गर्दीने फुलून गेली आहेत़ संत गजानन महाराज मठ, संत तनपुरे महाराज मठ, संत कैकाडी महाराज मठ यासह अन्य मठातही भाविकांची वर्दळ आहे़ मठ, धर्मशाळा, आश्रमशाळेत भजन, प्रवचन, किर्तनाचे सूर आळवले जात आहेत़ पंढरपुरात येणारा भाविक चंद्रभागा नदीत स्नान करून विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी दर्शनरांगेकडे जात आहेत. दर्शनरांगेत सहभागी होऊन अतिशय शांततेने ‘विठूमाऊलीचा आणि ज्ञानोबा-तुकारामाचा’ जयघोष करीत पददर्शनासाठी हळूहळू पावले टाकत पुढेपुढे सरकत आहेत़
इन्फो बॉक्स
वारीतील सोयी-सुविधा़़़
पददर्शनासाठी मंदिर समितीच्या वतीने दर्शन रांगेची सोय
दर्शन रांगेतील भाविकांसाठी मंदिर समिती आणि स्वयंसेवी संस्थेतर्फे मोफत चहा, पाण्याची सोय
दर्शन रांगेत होणारी घुसखोरी, चोरी रोखण्यासाठी २४ तास चोख पोलीस बंदोबस्त
मंदिर समितीतर्फे ८९ सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून संपूर्ण वारीवर नजर
६५ एकर क्षेत्रांवर वारकऱ्यांसाठी पाणी, वीज, रस्ते, औषधोपचार, स्वच्छतागृहांची सोय
पंढरपूर शहरात येणाऱ्या विविध मार्गावर बॅरेगेट उभारून जड वाहनांना बंदी
वाखरी तळ येथे जनावरांच्या बाजाराची सोय
व्यवसायीकांनी थाटली दुकाने़़़
यात्रेसाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर, प्रदक्षिणा मार्गावर छोट्या-मोठ्या व्यवसायिकांनी दुकाने थाटली आहेत. गेल्या दोन दिवसांत त्यांनी दुकानात वस्तूंची आकर्षक मांडणी केली आहे. यात प्रासादिक वस्तू, फोटो फे्रम, देवदेवतांच्या तांब्या, पितळीच्या मूर्ती, तुळशीच्या माळा, विविध धार्मिक ग्रंथ, सीडी, कॅसेट, कपडे यांचा समावेश आहे.

Web Title: More than three lakh pilgrims filed for Pandharpur on Tuesday