शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील 18 शहरांत अधिक प्रदूषण; चंद्रपूर आणि पुणे प्रदूषणात पुढे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 06:39 IST

औरंगाबाद, जालना, लातूरचाही समावेश

- विकास झाडेनवी दिल्ली : हवेतील शुद्धता कायम राखण्यासाठी पर्यावरण विभागाच्या वतीने काही मापदंड ठरवून दिले आहेत. मात्र, या मापदंडाला केराची टोपली दाखविणाऱ्या शहरांमध्ये दिल्ली राजधानी प्रथम क्रमांकावर आहे. दिल्ली हे सर्वात प्रदूषित शहर आहे, तर महाराष्ट्रात चंद्रपूर आणि पुण्याचा नंबर लागतो.केंद्र सरकारने देशातील १२४ शहरांची नावे संसदेत जाहीर केली. या शहरांनी प्रदूषणाच्या सीमा ओलांडल्या आहेत. केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी सांगितले की, हवेची गुणवत्ता विविध घटकांवर आधारित असते. त्या घटकांचा एकत्रित अभ्यास करून ठरावीक शहराचा प्रदूषणाचा स्तर ठरविणे अवघड आहे. त्यामुळे हवेची शुद्धता राखण्यासाठी काही मापदंड ठरविण्यात आले आहेत.या यादीनुसार दिल्लीतील हवेतील प्रदूषणाचे प्रमाण सरासरी १८१ इतके आहे तर भोपाळमधील हवेतील प्रदूषणाचा स्तर १७२, अमृतसरमधील प्रदूषणाचा स्तर १६६, जालंधरमधील प्रदूषणाचा स्तर १६५ आणि लुधियानामधील हवेतील प्रदूषणाचा स्तर १६१ इतका आहे. या यादीमध्ये सर्वाधिक प्रदूषित शहरे असलेल्या राज्यांत महाराष्ट्राचा पहिला नंबर येतो. देशात सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये १६, पश्चिम बंगालमध्ये ७, उत्तराखंड ३, मध्य प्रदेश ६, पंजाब ९, गुजरात ३, आंध्र प्रदेशातील १३ शहरांचा प्रदूषित शहरांमध्ये समावेश होतो. केंद्रीय पर्यावरण विभागाने हवेतील प्रदूषणाचा स्तर कमी करण्यासाठी १ एप्रिल २०२० पासून इंधने आणि वाहनांना बीएस ४ आणि बीएस ६ अशी मानांकने लागू करण्यात आली आहेत. सार्वजनिक वाहतुकीसाठी मेट्रोच्या उभारणीवर जास्त भर दिला जात आहे. स्वयंपाकासाठी हवा दूषित करणाऱ्या उपकरणांऐवजी सिलिंडर वापरण्यावर भर दिला जात आहे. आदी उपाययोजना करण्यात आल्या असल्याची माहिती दिली. देशात सर्वात प्रदूषित शहर दिल्ली देशात प्रदूषणात दिल्ली प्रथम क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेश, हरयाणा, पंजाब, उत्तराखंडने घेरलेल्या दिल्लीला सर्वाधिक प्रदूषणाचा फटका बसतो. नाेव्हेंबर ते मार्चपर्यंत दिल्लीतील प्रदूषणाची पातळी ५०० ते १००० पर्यंत असते.हरयाणा आणि पंजाब येथे तण जाळण्याचे दुष्परिणाम दिल्लीला भोगावे लागतात. केंद्र सरकार आणि दिल्लीसह हरयाणा, पंजाब व उत्तर प्रदेश राज्य अद्यापही यावर तोडगा काढू शकले नाही.मुंबई, नाशिक, नागपूर, सांगली, सोलापूरही प्रदूषित महाराष्ट्रात चंद्रपूर आणि पुणे सर्वाधिक प्रदूषित शहरे आहेत. राज्यातील १८ शहरे प्रदूषित आहेत. त्यात चंद्रपूर, पुणे, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बदलापूर, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नवी मुंबई, नाशिक, नागपूर, सांगली, सोलापूर, ठाणे, उल्हासनगर या शहरांचा समावेश आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषण