शहरं
Join us  
Trending Stories
1
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
9
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
10
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
11
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
12
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
13
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
14
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
15
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
16
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
17
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
18
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
19
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
20
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला

उन्हाळी सुट्टीनिमित्त एसटीच्या जादा बस,निवडणुकीसाठी ५०० बस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 18:41 IST

पुण्यामध्ये नोकरी तसेच शिक्षणासाठी येणाऱ्यांची संख्या खुप मोठी आहे. तसेच मराठवाड्यातून आलेले अनेक जण स्थानिक झाले आहे.

ठळक मुद्देपुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघात दोन टप्प्यात निवडणुकइयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा संपल्या असून सुट्यांमधील नियोजन सुरू

पुणे : शाळा, महाविद्यालयांना सुट्या सुरू होत असल्याने बाहेगावी जाणाऱ्यांची एसटी बसला मोठी गर्दी होते. यापार्श्वभुमीवर महामंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. पुणे विभागातील विविध आगारातून यावर्षी सुमारे १५० जादा बस सोडण्यात येणार आहे. प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात जाण्यासाठी प्रवाशांना बसची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.एसटी महामंडळाच्या पुणे विभागाकडून दरवर्षी जादा बस सोडण्यात येतात. बहुतेक शाळा व महाविद्यालयांना सुट्या सुरू झाल्या आहेत. इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा संपल्या असून सुट्यांमधील नियोजन सुरू झाले आहे. पुण्यामध्ये नोकरी तसेच शिक्षणासाठी येणाऱ्यांची संख्या खुप मोठी आहे. तसेच लगतच्या परिसरातही मराठवाड्यातून आलेले अनेक जण स्थानिक झाले आहे. बाहेरगावी जाण्यासाठी त्यांच्याकडून एसटीचा वापर केला जातो. त्याअनुषंगाने पुणे विभागाने नियमित बसव्यतिरिक्त सुमारे १५० जादा बसचे नियोजन केले आहे. पुण्यातून स्वारगेट व शिवाजीनगर बसस्थानकासह पिंपरी चिंचवड, सासवड, बारामती, इंदापुर, सासवड, दौंड, शिरूर, भोर अशा एकुण १३ स्थानकांतून या बस सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या गर्दीनुसार पुढील आठवड्यापासून बस सोडण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. -----------------

पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघात दोन टप्प्यात निवडणुक होत आहे. दि. २३ व २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यासाठी एसटी महामंडळाकडून ५०० हून अधिक बस दिल्या जाणार आहेत. या बस दि. २२ व २८ एप्रिल रोजी दुपारपर्यंत व दि. २३ व २९ एप्रिल रोजी दुपारनंतर निवडणुक कामासाठी जिल्या जाणार आहेत. त्यामुळे निवडणुक कर्मचारी, अधिकारी, ईव्हीएम मशिन व इतर साहित्याची ने-आण केली जाणार आहे. पुणे जिल्ह्यात एसटीकडे सध्या सुमारे १ हजार २५ बस आहेत. त्यातील निम्म्या बस निवडणुक कामासाठी द्याव्या लागणार असल्याने दि. २२ व दि. २८ एप्रिलला दुपारपर्यंत आणि दि. २३ व २९ एप्रिल रोजी दुपारनंतरची एसटी वाहतुकीचे नियोजन कोलमडणार आहे.

....................बस स्थानकनिहाय जादा गाड्याशिवाजीनगर - जालना, बीड, धुळे, लातूर, मालेगाव, अकोलास्वारगेट - तुळजापुर, बिदर, विजापुर, गुलबर्गा, गाणगापुर, पंढरपुर, दापोलीपिंपरी चिंचवड - लातुर, बीड, कोल्हापूर, सोलापूर, दापोलीसासवड - पंढरपुर, सातारा, नाशिक, औरंगाबादभोर - औरंगाबाद, नाशिक, पंढरपुर, महाड, कोल्हापूरनारायणगाव - संगमनेर, नाशिक, शिर्डी, बार्शी, औरंगाबाद, त्र्यंबकेश्वर.राजगुरूनगर - पैठण, धुळे, बार्शी, बीड.तळेगाव - शिर्डी, नाशिक, औरंगाबाद, तुळजापुरशिरूर - औरंगाबाद, तुळजापुर, जालना, बीडबारामती - औरंगाबाद, बीड, शिर्डी, सोलापुर, पंढरपुर, सातारा, दादरएमआयडीसी - लातूर, बीडइंदापूर - धारूर, लातूर, कोल्हापूर, सांगली, पुणे, तुळजापुर, इचलकरंजी, परळीदौंड - जळगाव, कोल्हापुर, औरंगाबाद

टॅग्स :PuneपुणेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकpassengerप्रवासीTravel Tipsट्रॅव्हल टिप्स