प्रवाशांच्या मदतीला आणखी ११२ एटीव्हीएम
By Admin | Updated: December 24, 2014 02:41 IST2014-12-24T02:41:53+5:302014-12-24T02:41:53+5:30
तिकीट खिडक्यांच्या रांगेतून सुटका करण्यासाठी रेल्वेकडून स्थानकांमध्ये एटीव्हीएम मशिन बसवण्यात आले

प्रवाशांच्या मदतीला आणखी ११२ एटीव्हीएम
मुंबई : तिकीट खिडक्यांच्या रांगेतून सुटका करण्यासाठी रेल्वेकडून स्थानकांमध्ये एटीव्हीएम मशिन बसवण्यात आले. प्रवाशांकडून या एटीव्हीएमला चांगला प्रतिसाद देण्यात आल्यानंतर मध्य रेल्वेकडून आणखी नवीन एटीव्हीएम मशिन बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २८८ नवीन एटीव्हीएमपैकी ११२ मशिन नुकत्याच बसविण्यात आल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली.
सध्या मध्य रेल्वेमार्गावर ३२0 एटीव्हीएम आहेत. चांगल्या प्रतिसादामुळे २८८ एटीव्हीएम मशिन विविध स्थानकांवर बसविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला होता. त्यानुसार ११२ एटीव्हीएम मशिन बसवण्यात आल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले. सात एटीव्हीएमपैकी चार भायखळा तर तीन सॅण्डहर्स्ट रोड स्थानकात बसविण्यात आले. ठाणे, दादर, कुर्ला, सायन, पनवेल, मशीद या स्थानकांतील गर्दी आणि एटीव्हीएमला प्रतिसाद पाहता तेथे जादा एटीव्हीएम मशिन बसविण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)