राज्यात १० कोटी टनांपेक्षा जास्त साखर उत्पादन
By Admin | Updated: June 4, 2015 23:20 IST2015-06-04T23:20:24+5:302015-06-04T23:20:24+5:30
साखर कारखान्यांनी गाळप हंगाम २०१४-१५ मध्ये ९ कोटी २९ लाख ८४ हजार मे. टन उसाचे गाळप करून १० कोटी ४ लाख ८० हजार मे. टन साखरेचे उत्पादन केले आहे.

राज्यात १० कोटी टनांपेक्षा जास्त साखर उत्पादन
राजीव लोहकरे - अकलूज
महाराष्ट्रातील ९९ सहकारी व ७९ खासगी अशा १७८ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम २०१४-१५ मध्ये ९ कोटी २९ लाख ८४ हजार मे. टन उसाचे गाळप करून १० कोटी ४ लाख ८० हजार मे. टन साखरेचे उत्पादन केले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा ११.२७ असून गतवर्षाच्या तुलनेत ०.१३ टक्के साखर उतारा कमी असल्याची माहिती राज्य साखर संघाचे अध्यक्ष खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी दिली.
कोल्हापूर विभागातील कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये ३७ कारखान्यांनी २१२.५५ लाख मे. टन उसाचे गाळप करून २६.८५ लाख मे. टन साखरेचे उत्पादन केले आहे. कोल्हापूर विभागाचा साखर उतारा सरासरी १२.५६ इतका आहे. हा साखर उतारा महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त आहे. या विभागातील सर्व कारखान्यांचा हंगाम संपला आहे.
पुणे विभागातील सातारा, पुणे व सोलापूर जिल्ह्यातील ६० कारखान्यांनी ३८६.६७ लाख मे. टन उसाचे गाळप करून ४२.८० लाख मे. टन साखरेचे उत्पादन घेतले आहे. या विभागातून सरासरी ११.0७ टक्के साखर उतारा मिळाला आहे. ६ कारखाने अद्याप गाळप करत आहेत.
अहमदनगर विभागातील अहमदनगर व नाशिक जिल्ह्यात २३ कारखान्यांनी १३०.00 लाख मे. टन उसाचे गाळप करून १४.३८ लाख मे. टन साखरेचे उत्पादन मिळवले आहे. त्यांना सरासरी ११.0७ टक्के साखर उतारा मिळाला आहे.
नांदेड विभागातील नांदेड, परभणी, हिंंगोली, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील ३० साखर कारखान्यांनी ११६.0८ लाख मे. टन उसाचे गाळप करून १२.३९ लाख मे. टन साखरेचे उत्पादन मिळवले आहे. त्यांना सरासरी १०.३७ टक्के साखर उतारा मिळालेला आहे. अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलडाणा व यवतमाळ जिल्ह्यातील १ सहकारी व १ खासगी अशा २ साखर कारखान्यांनी ४.८६ लाख मे. टन उसाचे गाळप करून 0.५० लाख मे. टन साखरेचे उत्पादन केले आहे. त्यांना सरासरी साखर उतारा १०.३१ टक्के मिळाला आहे. नागपूर विभागातील नागपूर, वर्धा व भंडारा जिल्ह्यांतील ४ खासगी साखर कारखान्यांनी ५.४६ लाख मे. टन उसाचे गाळप करून 0.५६ लाख मे. टन साखरेचे उत्पादन केले आहे. त्यांना १०.२७ टक्के सरासरी साखर उतारा मिळाला आहे.
गत हंगामापेक्षा या हंगामामध्ये २५३.५० लाख मे. टन अतिरिक्त उसाचे गाळप होऊन २७.७० लाख मे. टन जास्तीची साखर उत्पादित झाली आहे.
औरंगाबाद विभागातील धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यातील २२ साखर कारखान्यांनी ७४.२२ लाख मे. टन उसाचे गाळप करून ७.५२ लाख मे. टन साखरेचे उत्पादन मिळवले आहे. त्यांना सरासरी १०.१३ टक्के साखर उतारा मिळाला आहे.