म्हाडाच्या ९७२ घरांसाठी १ लाखापेक्षा जास्त अर्ज
By Admin | Updated: July 20, 2016 11:19 IST2016-07-20T11:19:00+5:302016-07-20T11:19:00+5:30
म्हाडाच्या मुंबईतील ९७२ घरांसाठी येत्या १० ऑगस्ट रोजी सोडत काढण्यात येणार असून, आतापर्यंत या घरांसाठी एक लाखापेक्षा जास्त अर्ज आले आहेत.

म्हाडाच्या ९७२ घरांसाठी १ लाखापेक्षा जास्त अर्ज
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २० - म्हाडाच्या मुंबई विभागातील ९७२ घरांसाठी येत्या १० ऑगस्ट रोजी सोडत काढण्यात येणार असून, आतापर्यंत या घरांसाठी एक लाखापेक्षा जास्त अर्ज आले आहेत. म्हाडाच्या सोडतीची घरे मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात आहे. म्हाडाच्या सोडतीच्या घरांसाठी २३ जून ते २३ जुलै यावेळेत नोंदणी करता येईल.
२४ जून ते २५ जुलै याकाळात ऑनलाईन अर्ज दाखल करता येतील. ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत २५ जुलै रात्री १२ वाजेपर्यंत आहे. तर अॅक्सिस बँकेत डीडी भरण्याचा कालावधी २४ जून ते २७ जूलै असा आहे. घरांची सोडत १० ऑगस्ट रोजी काढण्यात येईल. म्हाडाच्या ९७२ घरांपैकी ४७७ घरे खुल्या गटासाठी उपलब्ध आहे.
उच्च उत्पन्न गटातील सर्वात महागडी घरे दहिसरमधील शैलेंद्र नगर येथे आहेत; आणि त्यांची किंमत ८३ लाख ८६ हजार एवढी आहे. तर अत्यल्प उत्पन्न गटातील सर्वात स्वस्त घरे मालाड-मालवणी येथे असून, त्या घरांची किंमत ८ लाख १७ हजार एवढी आहे.
एकूण अर्जदार - १,००, ५५५
रजिस्ट्रेशन - ९४८२०
रक्कम डीपॉझीट संख्या - ३९,९५४