‘समृद्धी’विरोधात मुंबईत निघणारा मोर्चा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 03:50 IST2017-08-04T03:50:27+5:302017-08-04T03:50:30+5:30
समृद्धी महामार्गाच्या विरोधात येत्या १० आॅगस्ट रोजी मुंबईत निघणारा बाधित शेतकºयांचा मोर्चा रद्द करण्यात आला आहे.

‘समृद्धी’विरोधात मुंबईत निघणारा मोर्चा रद्द
नाशिक : समृद्धी महामार्गाच्या विरोधात येत्या १० आॅगस्ट रोजी मुंबईत निघणारा बाधित शेतकºयांचा मोर्चा रद्द करण्यात आला आहे.
मराठा क्रांती मोर्चामुळे पोलिसांनी परवानगी नाकारल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, याच दिवशी दि. १० रोजी ३१ तालुक्यांतील तहसील कार्यालयांसमोर निदर्शने करण्यात येणार आहे.
राज्य सरकारने समृद्धी मार्गाने बाधित दहा जिल्ह्यांत वेगवेगळे दर जाहीर केले आहेत. एक प्रकल्प एक दर, अशी आमची मागणी असून, त्यासाठी संघर्ष समिती उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे कॉ. देसले यांनी सांगितले.