पुण्यात मुसळधार
By Admin | Updated: November 24, 2015 02:55 IST2015-11-24T02:55:59+5:302015-11-24T02:55:59+5:30
गेल्या २४ तासांत पावसाने पुणे शहर व जिल्ह्याला झोडपले. तब्बल ९५ मिलिमीटर पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी रस्त्यांनाच ओढ्याचे स्वरूप आले होते

पुण्यात मुसळधार
पुणे : गेल्या २४ तासांत पावसाने पुणे शहर व जिल्ह्याला झोडपले. तब्बल ९५ मिलिमीटर पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी रस्त्यांनाच ओढ्याचे स्वरूप आले होते. शहरातील अनेक सोसायट्यांच्या संरक्षक भिंती पडल्याने वाहनांचे अतोनात नुकसान झाले. काही ठिकाणी वाहने अक्षरश: वाहून गेली. मंगळवारीही मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.
रविवारी दुपारपासून वातावरणात बदल जाणवत आहे. रविवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला. अनेक भागांत रात्रभर पाऊस सुरू होता. सोमवारी सकाळनंतर आभाळ पुन्हा दाटून आले. आज सकाळी आठ वाजेपर्यंत टेमघर धरण परिसरात १२२ मिलीमीटर पाऊस झाला, तर खडकवासला ९५, वरसगाव ५०, पानशेत धरण परिसरात ४६ मिमी पावसाची नोंद झाली होती़ सोमवारी रात्री उशिरापर्यंत या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू होता. सर्वाधिक फटका विश्रांतवाडी, धानोरी, सिंहगड रोड परिसराला बसला़