‘पडघा’ प्रकल्पग्रस्तांवर महिन्यात निर्णय
By Admin | Updated: July 20, 2016 05:09 IST2016-07-20T05:09:51+5:302016-07-20T05:09:51+5:30
ठाणे जिल्ह्यातील पडघा येथील विद्युत प्रकल्पासाठी जमिनी संपादित केलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर एका महिन्यात धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल

‘पडघा’ प्रकल्पग्रस्तांवर महिन्यात निर्णय
मुंबई : ठाणे जिल्ह्यातील पडघा येथील विद्युत प्रकल्पासाठी जमिनी संपादित केलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर एका महिन्यात धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिले. प्रश्नोत्तराच्या तासात राष्ट्रवादीचे आनंद ठाकूर यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. या प्रकल्पग्रस्तांना शासकीय अथवा निमशासकीय सेवेत रुजू करून घेता येत नाही. त्यामुळे संबंधितांना ५ लाख रुपये एकरकमी अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे संबंधितांना आयटीआयचे प्रशिक्षणही देण्यात आले असल्याचे येरावार यांनी नमूद केले. यावेळी
जयंत पाटील, यांनी उपप्रश्न उपस्थित केला. (प्रतिनिधी)