मान्सून वेळेत केरळमध्ये धडकणार !

By Admin | Updated: May 30, 2016 04:13 IST2016-05-30T04:13:17+5:302016-05-30T04:13:17+5:30

अंदमानात अडकलेला मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे.

Monsoon will hit Kerala in time! | मान्सून वेळेत केरळमध्ये धडकणार !

मान्सून वेळेत केरळमध्ये धडकणार !


पुणे : अंदमानात अडकलेला मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मान्सून केरळात ठरलेल्या वेळेत जूनच्या सुरुवातीलाच दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नैर्ऋत्य मोसमी पावसाने आग्नेय बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग व्यापला असून, अंदमान समुद्र व अंदमान द्वीपसमूहाच्या उर्वरित भागात झालेली वाटचाल स्थिर आहे़, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या संचालक सुनीता देवी यांनी सांगितले. ७ जूनच्या दरम्यान मान्सूनचे केरळमध्ये आगमन होईल, असा अंदाज यापूर्वीच वर्तविण्यात आला आहे.
दरम्यान, राज्यात येते दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़ देशात दक्षिणेत अनेक ठिकाणी पाऊस झाला असून उत्तराखंडातील अनेक ठिकाणी, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, नागालंड, झारखंड, आसाममधील काही ठिकाणी पाऊस झाला़ (प्रतिनिधी)
>पूर्वमोसमी
पावसात मोठी घट
अंदमान, निकोबारपासून
बहुतांशी भागात पूर्वमोसमी पावसात सरासरीपेक्षा मोठी घट झाली आहे. औरंगाबाद, सोलापूर, नाशिक वगळता अन्यत्र पूर्वमोसमी पाऊस कमी झाला आहे़ कोकण व गोव्यामध्ये सर्वाधिक ८० टक्के घट आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, विदर्भ, पूर्व व पश्चिम मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, उत्तराखंड, आसाम, मेघालय इथे तो अधिक झाला आहे़

Web Title: Monsoon will hit Kerala in time!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.