दोन दिवसांत मान्सून केरळात !
By Admin | Updated: June 7, 2016 07:43 IST2016-06-07T07:43:07+5:302016-06-07T07:43:07+5:30
राज्यभरात पूर्वमोसमी पावसाने वर्दी दिल्यानंतर मान्सून आता ४८ तासांत केरळात दाखल होईल.

दोन दिवसांत मान्सून केरळात !
पुणे : राज्यभरात पूर्वमोसमी पावसाने वर्दी दिल्यानंतर मान्सून आता ४८ तासांत केरळात दाखल होईल. त्याच्या पुढील मार्गक्रमणास पूरक अशी परिस्थिती असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.
बंगालच्या उपसागरात गेल्या तीन दिवसांपासून मान्सूनचा मुक्काम असून, अंदमान निकोबार, लक्ष्यद्वीप, तसेच केरळमध्ये सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे़ मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी गडगडाटी वावटळीसह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़
राज्यात पुढील तीन ते चार दिवस दक्षिण कोकणात बऱ्याच ठिकाणी, उत्तर कोकण व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर राज्याच्या उर्वरित भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़ १० जूनला उत्तर कोकण व मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. मुंबई व उपनगरात पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे़