महाबळेश्वरातल्या पर्यटकांना मान्सूनच्या सरींची भेट..
By Admin | Updated: June 10, 2016 18:02 IST2016-06-10T18:02:17+5:302016-06-10T18:02:17+5:30
सुट्टी संपत आली तरीही केवळ 'हिल स्टेशन'वरच्या चिंब पावसात मनसोक्त भिजण्यासाठी महाबळेश्वरमध्ये थांबलेल्या चोखंदळ पर्यटकांना अखेर आज मान्सूनच्या पहिल्या-वहिल्या सरींची भेट झाली.

महाबळेश्वरातल्या पर्यटकांना मान्सूनच्या सरींची भेट..
>ऑनलाइन लोकमत
महाबळेश्वर, दि. १० - सुट्टी संपत आली तरीही केवळ 'हिल स्टेशन'वरच्या चिंब पावसात मनसोक्त भिजण्यासाठी महाबळेश्वरमध्ये थांबलेल्या चोखंदळ पर्यटकांना अखेर आज मान्सूनच्या पहिल्या-वहिल्या सरींची भेट झाली.
शुक्रवारी सकाळपासूनच या परिसरात आभाळ दाटून आलं होतं. दुपारी अकस्मातपणे पावसाच्या सरी सुरु झाल्या, तसं या पहिल्या पावसात भिजण्यासाठी पर्यटक चक्क रस्त्यावरच मुद्दामहून थांबले.बराच वेळ या ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्या.
दुपारनंतर मात्र बाजारपेठेत सर्वत्र धुक्याचं साम्राज्य पसरलं. वातावरणातही लगेच फरक पडला. थंडी वाढल्यानं छत्रीसोबतच स्वेटरही घेऊन पर्यटक मंडळी फिरताना दिसू लागली.