मान्सून अरबी समुद्रातून पुढे सरकला, कोकणात पावसाच्या सरी
By Admin | Updated: June 19, 2016 12:47 IST2016-06-19T12:47:09+5:302016-06-19T12:47:09+5:30
कोकणऐवजी विदर्भाच्या वाटेने महाराष्ट्रात दाखल झालेला मान्सून मध्य अरबी समुद्रातून पुढे सरकला आहे.

मान्सून अरबी समुद्रातून पुढे सरकला, कोकणात पावसाच्या सरी
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ - कोकणऐवजी विदर्भाच्या वाटेने महाराष्ट्रात दाखल झालेला मान्सून मध्य अरबी समुद्रातून पुढे सरकला आहे. हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार कोकणात हरणीत सात सेमी, देवगडमध्ये सहा सेमी, कानाकोना तीन मार्मगोवामध्ये पाच सेमी पावसाची नोंद झाली आहे.
सोलापूरमध्ये ३.२ सेमी आणि सांगलीत ६.४ सेमी पावसाची नोंद झाली आहे. मराठवाडा आणि परभणीमध्येही काही भागात पाऊस झाला आहे. कोकण, गोव्यामध्ये पुढच्या दोन दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.