महाराष्ट्रात मान्सून आला, पण पाऊस का नाही?
By Admin | Updated: June 20, 2014 03:16 IST2014-06-20T03:16:37+5:302014-06-20T03:16:37+5:30
मान्सून आल्याचा लोकांना आनंद असतो़ पण यंदा मात्र, मान्सून चोरपावलाने दाखल झाला़ हवामान खात्याने जाहीर केले तरी त्यावर लोकांचा विशेषत: बळीराजाचा विश्वासच बसलेला नाही़

महाराष्ट्रात मान्सून आला, पण पाऊस का नाही?
>पुणो : पुणो, मुंबईत मान्सून दाखल झाल्याचे हवामान खात्याने रविवारी जाहीर केल़े गुरुवारी मान्सूनने मध्य महाराष्ट्राचा आणखी काही भाग व्यापला़ पण या परिसरात अजूनही मोठा पाऊस झालेला नाही़ केवळ रिमङिाम पावसाने हजेरी लावली़ मोसमी पाऊस येताना अगदी वाजतगाजत येतो़ सुरुवातीच्या पावसाचा जोर इतका असतो की काही वेळा व्यवस्था कोलमडून पडत़े असे असले तरी मान्सून आल्याचा लोकांना आनंद असतो़ पण यंदा मात्र, मान्सून चोरपावलाने दाखल झाला़ हवामान खात्याने जाहीर केले तरी त्यावर लोकांचा विशेषत: बळीराजाचा विश्वासच बसलेला नाही़
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या उपमहासंचालिका डॉ़ मेधा खोले यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी अरबी समुद्रात नानौक चक्रीवादळ निर्माण झाले होत़े ते ओमानच्या दिशेने गेल्याने यंदा मोसमी पावसाचा पॅटर्नच बदलला आह़े अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असला तरी त्याची तीव्रता कमी आह़े त्यामुळे तो सक्रिय नाही़ याचा अर्थ मान्सून आला नाही असे होत नाही़ कमाल तापमान कमी होणो, वा:यांच्या वेगात वाढ होणो, वातावरणातील आद्र्रता वाढणो या पावसाळ्याशी निगडित घटक दिसून आले की मान्सून आल्याचे मानले जात़े त्यानुसार मान्सूनचे आगमन झाल्याचे हवामान विभागाकडून जाहीर केले जात़े पुण्यात व मध्य महाराष्ट्रात हे सर्व घटक दिसून आल्याने मान्सूनचे आगमन झाल्याचे जाहीर करण्यात आले असल्याचे डॉ़ खोले यांनी सांगितल़े किनारपट्टी प्रदेश आणि मध्य भारत येथील मान्सून आल्याचे निकष वेगवेगळे आहेत़ किनारपट्टी भागात सलग तीन दिवस 2़5 सेंटीमीटर पाऊस झाला की मान्सूनचे आगमन झाल्याचे जाहीर केले जात़े
पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, त्याचा परिणाम होऊन नैर्ऋत्य मोसमी पावसाची उत्तरेकडे आगेकूच सुरू आह़े अरबी समुद्रातही कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. नैर्ऋत्य मोसमी पावसाने गुरुवारी मध्य महाराष्ट्राचा आणखी काही भाग व्यापला आह़े मात्र, त्यात बाष्प कमी असल्याने पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आह़े नैर्ऋत्य मोसमी पावसाचे गुरुवारी मध्य महाराष्ट्र, विदर्भाच्या काही भागांत आगमन झाले आह़े