मान्सून रविवारपर्यंत महाराष्ट्रात!
By Admin | Updated: June 17, 2016 02:59 IST2016-06-17T02:59:32+5:302016-06-17T02:59:32+5:30
दुष्काळाने होरपळत असलेल्या महाराष्ट्रात रविवारपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली. शुक्रवारपासून कोकणात तर रविवारपासून राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची

मान्सून रविवारपर्यंत महाराष्ट्रात!
पुणे : दुष्काळाने होरपळत असलेल्या महाराष्ट्रात रविवारपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली. शुक्रवारपासून कोकणात तर रविवारपासून राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
कनार्टकात तळ ठोकून बसलेल्या मान्सूनला आगेकूच करण्यासाठी अनुकुल स्थिती निर्माण होत आहे. येत्या २-३ दिवसांत मान्सून महाराष्ट्रासह ओरिसा, छत्तीसगड, झारखंड आणि बिहार या राज्यांमध्ये दाखल होईल. सध्य कोकण वगळता राज्याचा उर्वरित भाग कोरडा आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत कोकणात काही ठिकाणी पाऊस पडला. वेंगुर्ला येथे १००, पेडणे, सांगे येथे ७०, कणकवली येथे ६०, म्हापसा येथे ४०, कुडाळ, मालवण, सावंतवाडी येथे ३०, राजापूर, वैभववाडी येथे २० तर देवगड, संगमेश्वर, राधानगरी, गगनबावडा येथे १० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. (प्रतिनिधी)