शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 07:04 IST

Monsoon Update: पदार्पणातच दोन-चार शतके ठोकून विक्रमांची बरसात करणाऱ्या क्रिकेटपटूसारखा माहोल केल्यानंतर एकदम ‘बॅड पॅच’ आल्यासारखी मान्सूनची स्थिती झाली आहे. २६ मे रोजी मुंबईत आणि त्यानंतर गडचिरोलीमार्गे विदर्भात दाखल झालेल्या मान्सूनने मोठा ब्रेक घेतला.

मुंबई  - पदार्पणातच दोन-चार शतके ठोकून विक्रमांची बरसात करणाऱ्या क्रिकेटपटूसारखा माहोल केल्यानंतर एकदम ‘बॅड पॅच’ आल्यासारखी मान्सूनची स्थिती झाली आहे. २६ मे रोजी मुंबईत आणि त्यानंतर गडचिरोलीमार्गे विदर्भात दाखल झालेल्या मान्सूनने मोठा ब्रेक घेतला. १३ जूनपासून पुन्हा महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होऊन मध्यम पावसाची शक्यता आहे.

गेल्या आठ-दहा दिवसांपासून रुतून बसलेला मान्सून खान्देश, नाशिक व विदर्भातील उत्तरेकडील जिल्ह्यांत पोहोचू शकला नाही. निम्मा महाराष्ट्राच मान्सूनने व्यापला असून, शेतकरी पेरणीसाठी सक्रिय मान्सूनच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या मान्सून खान्देशसह विदर्भाच्या अलीकडेच थबकला आहे. त्याच्या पुढील प्रवासासाठी पोषक वातावरण नाही. पुढील चार दिवसही राज्यात किरकोळ पावसाची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तविली आहे. मान्सूनच्या वाटचालीसाठी वातावरण अनुकूल आहे. मृग नक्षत्राचा पावसाची शक्यता आहे, असे अभ्यासकांना वाटते.

१२४ वर्षांतील सर्वांत ओला महिनामे महिन्याच्या उत्तरार्धात व मान्सून मुंबईत दाखल होण्याच्या काळात देशात अधिक पावसाची नोंद झाल्याचे हवामान खात्याने म्हटले होते. मे महिन्यात १२४ वर्षांत प्रथमच १२६.७ मिमी पाऊस झाला. 

राज्यात कुठे, काय शक्यता?९ जूनला मुंबईसह कोकणातील ७ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे. नंतर १० ते १२ जूनदरम्यान पावसाचा जोर काहीसा कमी होईल.१२ जूनपर्यंत उर्वरित महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यांत  तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे.विदर्भात ‘मे’ची कसर जूनमध्येनागपूर : रविवार नागपूरकरांना होरपळून टाकणारा ठरला. तापमान तब्बल ३.५ अंशाने वाढून ४३ अंशांवर पोहोचले. अख्खा मे सौम्य राहिला, पण जूनच्या पहिल्याच आठवड्यात सूर्याने रौद्र रूप दाखवले.

शेतकऱ्यांनी मान्सूनच्या पावसाच्या ओलीवर व मान्सून सक्रिय झाल्यावर १५ जूननंतर चांगल्या वाफशावर पेरणीचा निर्णय घ्यावा.- माणिकराव खुळे, हवामानतज्ज्ञ

टॅग्स :monsoonमोसमी पाऊसRainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र