शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
3
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
4
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
5
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
6
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
7
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
8
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
9
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
10
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
11
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
12
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
13
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
14
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
15
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
16
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
17
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
18
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
19
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
20
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले

मान्सूनने अर्धा महाराष्ट्र व्यापला, तरीही पावसाची मात्र हुलकावणी; मुंबईकर उकाड्याने हैराण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 05:49 IST

अर्ध्या महाराष्ट्रावर स्वार झालेल्या वरुणराजाने काही ठिकाणी अद्यापही हुलकावणी दिली आहे.

मुंबई :

सिंधुदुर्गनंतर रायगड, मुंबई आणि ठाणे काबीज करत मान्सूनने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याकडे आपली घौडदौड सुरू ठेवली असली, तरी अर्ध्या महाराष्ट्रावर स्वार झालेल्या वरुणराजाने काही ठिकाणी अद्यापही हुलकावणी दिली आहे. विशेषत: मुंबईत दाखल झालेल्या मान्सूनने गेल्या पाच दिवसापासून पाठ फिरवल्याने मुंबई आजही कोरडीच आहे. त्यात उन्हाचा तडाखा आणि घामाच्या धारा नागरिकांचा जीव काढत असून, वाढलेल्या उकाड्यामुळे मुंबईकर चातकासारखे पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

महाराष्ट्रात १ ते १५ जूनदरम्यान सरासरी ७६.२ मिमी पावसाची नोंद होते. प्रत्यक्षात मात्र आजवर ही नोंद ३२.५ मिमी असून, पडलेला पाऊस उणे ५७ टक्के आहे. विभागवार आकडेवारीनुसार, कोकण आणि गोव्यात सरासरी २३४.५ मिमी पावसाची नोंद अपेक्षित होते, परंतु आजवर केवळ ९९.४ मिमी पाऊस पडला आहे. 

५८ टक्के एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रात सरासरी ६४.३ मिमी पावसाची अपेक्षा असतानाच २८.३ मिमीची नोंद झाली असून हा पाऊस ५६ टक्के आहे. मराठवाड्यात ४१.४ मिमी एवढा पाऊस झाला असून प्रत्यक्षात सरासरी ५९.८ मिमी एवढा पाऊस पडतो. हा पाऊस फक्त ३१ टक्के आहे. विदर्भात १६.३ मिमी पावसाची नोंद झाली असून, येथे सरासरी प्रत्यक्षात ५६.४ मिमी पाऊस अपेक्षित असतो. यावेळी केवळ ७१ टक्के एवढा पाऊस पडला आहे.मराठवाड्यात दाखलमान्सून मराठवाड्याच्या आणखी काही भागात दाखल झाला आहे. गेल्या २४ तासात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी, तर विदर्भात काही ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे.

पावसाचा प्रवास१६ ते १९ जून : काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल.१६ जून : मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल.१८ जून : कोकण आणि गोव्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण किनारपटटीवर सोसाट्याचा वारा वाहील. 

 १ ते १५ जूनपर्यंतचा पाऊसमुंबई शहरटक्के : उणे ५४  प्रत्यक्ष : ८३.५ मिमीसरासरी : १८२.९ मिमीमुंबई उपनगरटक्के : ४३ प्रत्यक्ष : ३१६३.४ मिमीसरासरी : २२०५.८ मिमी

टॅग्स :Rainपाऊस