शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

मान्सूनचा जोर कायम; आजही कोसळधारा, नदी-नाल्यांना पूर, वाहतूक विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 06:20 IST

Monsoon : मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात गुरुवारी दिवसभर पावसाचा अधूनमधून मारा सुरू होता. मुंबईत पावसामुळे पाच ठिकाणी बांधकामाचा भाग कोसळला. सहा ठिकाणी शॉर्टसर्किट झाले. आठ ठिकाणी झाडे कोसळली. 

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाल्याने पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टी ते केरळ किनारपट्टीलगत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, विदर्भ व लगतच्या दक्षिण छत्तीसगढवर चक्रीय चक्रवात तयार झाले आहे. मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुन्हा एकदा मान्सूनच्या नोंदीने चढा आलेख गाठला आहे.  

मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात गुरुवारी दिवसभर पावसाचा अधूनमधून मारा सुरू होता. मुंबईत पावसामुळे पाच ठिकाणी बांधकामाचा भाग कोसळला. सहा ठिकाणी शॉर्टसर्किट झाले. आठ ठिकाणी झाडे कोसळली. कांदिवली पूर्व येथील पोईसरमधील कमलेश कम्पाउंडमधील सार्वजनिक शौचालयाचा भाग कोसळला. यात तिघे जखमी झाले. मराठवाड्यातील बहुतेक जिल्ह्यात पावसाने दमदार पुनरागमन केले. जालन्यात दुधना, कुंडलिका नद्यांना पूर आला आहे. परतूर येथील निम्नदुधना प्रकल्पाचे चार दरवाजे उघडण्यात आले असून, नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातही बुधवारी सर्वदूर मुसळधार पाऊस पडला. कन्नड तालुक्यात गेल्या २४ तासांत  आठपैकी पाच महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली. परभणीतील पालम तालुक्यात लेंडी नदीला पूर आल्याने ६ गावांचा संपर्क तुटला होता. हिंगोली आणि लातूर जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली. 

विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात संततधार पावसाने नदी, नाले ओसंडून वाहू लागले असून, महागाव तालुक्यात एका शेतकऱ्याचा पुरात मृत्यू झाला. उमरखेड तालुक्यातील शिवराजनगर तांड्याला पुराचा  वेढा पडला. उमरखेड-पुसद मार्गावरील दहागाव नाल्याला पूर आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. नागपूर-बोरी-तुळजापूर महामार्गावर मुडाणा येथे पुलावर पुराचे पाणी आल्याने वाहतूक प्रभावित झाली होती. मेहकर तालुक्यात अतिवृष्टीची नोंद बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. गडचिरोली, भंडारा, अकोला आणि वाशिम जिल्ह्यांतही पावसाने हजेरी लावली. नाशिक आणि खान्देशातही बहुतांश ठिकाणी पावसाचे दमदार पुनरागमन झाले. इकडे कोकणात रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली.  

कोकण, मराठवाडा, विदर्भात आजही पाऊस शुक्रवारी कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार तर मराठवाड्यासह विदर्भात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे. २१ ऑगस्ट रोजीही राज्यभरात असेच हवामान राहील.  

या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यताठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक जिल्ह्यांत शुक्रवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. उर्वरित जिल्ह्यांत पावसाचा जोर कमी राहील.

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र