शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Monsoon Rain News: चिंब भिजण्यास तयार रहा! मान्सून... कमिंग सून; सहा दिवस आधीच राज्यात दाखल होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 06:35 IST

राज्यात साधारणपणे मान्सून ७ किंवा ८ जून रोजी तळकोकणात दाखल होतो; पण यंदा त्यापूर्वीच मान्सून महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो.

लोकमत न्यूज नेटवर्क । पुणे : उन्हामुळे जिवाची काहिली होत असताना पावसाची चातकासारखी वाट पाहत असलेल्यांसाठी आनंदवार्ता आहे. नेहमीपेक्षा ४ दिवस आधीच, म्हणजे २७ मे रोजी, मान्सून केरळात धडकणार असून राज्यात १ जून रोजी पावसाचे आगमन होणार आहे. हवामान विभागाचे डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी ही माहिती दिली.

विनाअडथळा प्रवासराज्यात साधारणपणे मान्सून ७ किंवा ८ जून रोजी तळकोकणात दाखल होतो; पण यंदा त्यापूर्वीच मान्सून महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो. उत्तरेकडे सरकताना मान्सूनचा वेग मंदावतो. मात्र, मान्सूनच्या प्रवासात सध्या तरी कोणतेही अडथळे दिसत नाहीत. त्यामुळे तो किमान सहा दिवस लवकर राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे.

येत्या आठवड्यात वळवाची शक्यताविभागाने मे महिन्याच्या दिलेल्या अंदाजानुसार देशात पाऊस जास्त असण्याची शक्यता आहे. मात्र, आतापर्यंत तसा पाऊस झालेला नाही. दक्षिणेकडील राज्यांत तो जोरदार कोसळला आहे. मेच्या  दुसऱ्या पंधरवड्यात कोकण, दक्षिण महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार देशात सरासरीच्या ९९% पावसाची शक्यता आहे. दुसऱ्या टप्प्याचा अंदाज मेअखेरीस येण्याची शक्यता आहे. त्यात सबंध देशात पावसाचे वितरण कसे असेल याचा अंदाज दिला जाईल. याचा फायदा शेतकऱ्यांना होईल.     - डॉ. कृष्णानंद होसाळीकर,       अतिरिक्त महासंचालक,    हवामान विभाग

वर्ष    अंदाज     आगमन२०१७     ३० मे    ३० मे २०१८     २९ मे    २९ मे२०१९     ६ जून     ८ जून२०२०     ५ जून     १ जून २०२१     ३ जून     ३१ मे

टॅग्स :Monsoon Specialमानसून स्पेशलRainपाऊस