मान्सून ४८ तासांत केरळमध्ये

By Admin | Updated: June 4, 2015 04:47 IST2015-06-04T04:47:02+5:302015-06-04T04:47:02+5:30

नैर्ऋत्य मोसमी पावसासाठी (मान्सून) अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या ४८ तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होईल

Monsoon in 48 hours in Kerala | मान्सून ४८ तासांत केरळमध्ये

मान्सून ४८ तासांत केरळमध्ये

पुणे : नैर्ऋत्य मोसमी पावसासाठी (मान्सून) अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या ४८ तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने बुधवारी वर्तविला आहे.
या आधी मान्सून ३० मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज वर्तविला होता. अरबी समुद्रात दाखल झाल्यानंतर मान्सूनच्या मार्गक्रमणात अडथळे निर्माण झाल्याने तो श्रीलंकेमध्येच खोळंबला होता. मात्र आता आगेकूच करण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. बुधवारी त्यात आणखी वाढ झाली. अंदमान-निकोबार बेट, केरळ, तामिळनाडू या राज्यांमध्ये अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे.

Web Title: Monsoon in 48 hours in Kerala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.