मोनो रेल सेवेची भाडेवाढ प्रस्तावित नाही- डॉ. रणजित पाटील

By Admin | Updated: March 29, 2017 18:39 IST2017-03-29T18:39:35+5:302017-03-29T18:39:35+5:30

मुंबई उपनगरात सुरू असलेल्या मोनो रेल सेवेची भाडेवाढ प्रस्तावित नसल्याचे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आज विधान परिषदेत दिली

Monorail service is not proposed to be hiked - Dr. Ranjeet Patil | मोनो रेल सेवेची भाडेवाढ प्रस्तावित नाही- डॉ. रणजित पाटील

मोनो रेल सेवेची भाडेवाढ प्रस्तावित नाही- डॉ. रणजित पाटील

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 29 - मुंबई उपनगरात सुरू असलेल्या मोनो रेल सेवेची भाडेवाढ प्रस्तावित नसल्याचे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आज विधान परिषदेत दिली.

मुंबईतील मोनो रेल्वे सेवेची भाडेवाढ रद्द करण्यासंदर्भातील प्रश्न आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित करण्यात आला होता. विधान परिषद सदस्य आर्किटेक्ट अनंत गाडगीळ यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. पाटील म्हणाले की, रेल्वे आणि मेट्रो रेल्वे याबरोबरच मुंबईकरांना प्रवासासाठी मोनो रेल सुरू करण्यात आली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्यामार्फत सध्या मोनो रेलच्या सिक्युरिटीसाठी 20 ते 25 टक्के खर्च करण्यात येत आहे. मात्र मोनो रेलचे भाडे वाढविले जाणार नसून तसे प्रस्तावितही नाही, अशी माहितीही त्यांनी दिली आहे. 

Web Title: Monorail service is not proposed to be hiked - Dr. Ranjeet Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.