मोवाडमध्ये सत्तांतर; वाडी पालिकेत त्रिशंकू
By Admin | Updated: April 24, 2015 01:36 IST2015-04-24T01:36:25+5:302015-04-24T01:36:25+5:30
वाडी नगर परिषद स्थापन झाल्यानंतर पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत कुणालाही बहुमत मिळू शकले नाही. तर मोवाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता उलथवून लावत

मोवाडमध्ये सत्तांतर; वाडी पालिकेत त्रिशंकू
गणेश खवसे
वाडी नगर परिषद स्थापन झाल्यानंतर पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत कुणालाही बहुमत मिळू शकले नाही. तर मोवाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता उलथवून लावत भाजपाने एकहाती सत्ता प्राप्त केली. कामठी येथील पोटनिवडणुकीत बहुजन रिपब्लिकन एकता मंचाने काँग्रेसकडून जागा हिसकावली.
वाडी नगर परिषदेमध्ये मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह दिग्गजांनी प्रचाराचा धुराळा उडवित निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळू शकले नाही. दुसरीकडे बहुजन समाज पक्षाने ७ जागा मिळवित दबदबा निर्माण केला. भाजपाला १०, शिवसेनेला २, बसप ७ आणि १ अपक्ष उमेदवार विजयी झाला. राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या. काँग्रेसला १ जागा मिळविण्यात यश आले. मोवाड नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीला अपयश आले. येथे राष्ट्रवादीची गेल्या १० वर्षांपासून सत्ता होती. मात्र या निवडणुकीत भाजपाने कंबर कसल्याने त्यांना १७पैकी ९ जागा मिळाल्याने बहुमत प्राप्त झाले. सोबतच शिवसेनेचे २ उमेदवार विजयी झाले. राष्ट्रवादीला ५ तर काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले. मोवाड येथील वॉर्ड क्र. १६मध्ये ईश्वरचिठ्ठीने राष्ट्रवादीच्या रंजना सोळंके यांना तारले.