अनसिंगमध्ये माकडाची दहशत!
By Admin | Updated: December 29, 2014 23:49 IST2014-12-29T23:49:18+5:302014-12-29T23:49:18+5:30
महिनाभरापासून उच्छाद : बाजारपेठ बंद ठेवण्याचा इशारा.

अनसिंगमध्ये माकडाची दहशत!
अनसिंग (जि. वाशिम) : अनसिंग येथे एक महिन्यापासून एका माकडाने धुमाकूळ घातला असून, आतापर्यंत या माकडाने २५ जणांवर हल्ले केले आहेत. वनविभाग या माकडाचा बंदोबस्त करण्यासाठी ठोऊ पाऊलं उचलत नसल्याने ग्रामस्थांनी बाजारपेठ बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. माकडाच्या उच्छादाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मंजुरांवर कामधंदा सोडून कुटुंबावर लक्ष देण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
माकडाला पकडण्यासाठी वनविभागाने एक पथक पाठविले होते. या पथकाने माकडाला पकडण्यासाठी प्रयत्न केले; मात्र पथकास यश आले नाही. महिनाभरात माकडाच्या हल्ल्यात २५ ग्रामस्थ जखमी झाले. त्यापैकी दोन ग्रामस्थ गंभीर जखमी असून, त्यांच्यावर अकोला येथे उपचार सुरु आहेत. महत्वाचे म्हणजे, गावातील ग्रामीण रुग्णालयात माकडाने चावा घेतल्यानंतर दिली जाणारी लसच उपलब्ध नसल्याने, जखमींना उपचारासाठी सरळ शहराकडे धाव घ्यावी लागते. त्यामुळे ग्रामस्थांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे; मात्र या गंभीर प्रकाराकडे वनविभागाने डोळेझाक केली आहे.
माकडाचा उच्छाद एवढा वाढला की, शाळेत विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. वनविभाग ठोस उपाययोजना करीत नसल्याने ग्रामस्थांनी मंगळवारी बाजारपेठ बंद इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.