पैशांचा पाऊस, आणखी चौघे अटकेत
By Admin | Updated: June 6, 2016 03:19 IST2016-06-06T03:19:01+5:302016-06-06T03:19:01+5:30
२५ लाखांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक करणाऱ्या आणखी चार भामट्यांना पोलिसांनी अटक केली.

पैशांचा पाऊस, आणखी चौघे अटकेत
मंडणगड (जि.रत्नागिरी) : २५ लाखांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक करणाऱ्या आणखी चार भामट्यांना पोलिसांनी अटक केली.
तालुक्यातील सुर्ले येथे पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी मुख्य सूत्रधार राजू मारुती पवार (वय ३५, रा. देसगाव, कळवण, जि. नाशिक) याच्यासह मगन रमझोड पवार (३८, जामेद, जि. धुळे) या दोघांना लोणावळा येथून यापूर्वीच अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, राज्यातील विविध ठिकाणी तपास करून आणखी चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये अतुल शंकर मुणगेकर (३६, ऐरोली, नवी मुंबई), पंडित ऊर्फ बंटी गंगारा भोये (२४, बोरगाव, जि. नाशिक), सुजित अशोक लांमगे (३५, शेंडी, जि. अहमदनगर), राजेंद्र अकनात बनसोडे (३५, शेंडी, अहमदनगर) यांचा समावेश आहे. त्यांना १३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. (प्रतिनिधी)