धाक दाखवून पैशांची बॅग लंपास
By Admin | Updated: September 7, 2015 01:03 IST2015-09-07T01:03:39+5:302015-09-07T01:03:39+5:30
दुचाकीवरून १५ लाख रक्कम असलेली पैशांची बॅग घेऊन निघालेल्या एका दलालाला चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना चुनाभट्टी येथे घडली

धाक दाखवून पैशांची बॅग लंपास
मुंबई : दुचाकीवरून १५ लाख रक्कम असलेली पैशांची बॅग घेऊन निघालेल्या एका दलालाला चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना चुनाभट्टी येथे घडली. याप्रकरणी दोन अनोळखी इसमांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वांद्रे येथील रहिवाशी मोहम्मद कुरेशी (३७) हे दलालीचे काम करतात. शनिवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास देवनार येथून मित्राच्या दुचाकीवरुन ते चेंबूर सायन हायवे मार्गाने निघाले. तेव्हा मागून आलेल्या दोन लुटारुंनी दुचाकीला धडक देत त्यांना खाली पाडले आणि चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील पैशांची बॅग हिसकावली. त्यांनतर डोळ्यात मिर्ची पावडर टाकून लुटारुंनी बॅगसेह पळ काढला.
मोहम्मद कुरेशी यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी लुटमारीचा गुन्हा दाखल केला आहेत. या परिसरातील सीसीटीव्हीतीच फूटेजच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)