मुंबई : मुलुंडमधील खातेदाराच्या मोबाइलवर आलेल्या मेसेजमुळे सोमवारी सर्वांचीच झोप उडाली. दिल्लीतील एटीएममधून त्यांच्या खात्यातून पैसे गेल्याचा हा संदेश होता. एकापाठोपाठ एक अशा ३५ तक्रारदारांनी नवघर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे.नवघर पूर्वेकडील कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएममध्ये अखेरचे पैसे काढलेल्या खातेदारांचा यामध्ये समावेश आहे. मुलुंड रेल्वे स्थानकाशेजारी हे एटीएम आहे. रविवारी रात्रीपासूनच खातेदारांना बँकेतून पैसे जात असल्याचे मेसेज आले. स्किमर लावून पैसे चोरल्याचा, तसेच यामागे दिल्लीतील टोळीचा हात असल्याचा संशय नवघर पोलिसांना असून, त्या दिशेने तपास सुरू आहे.
मुलुंडमध्ये ATM चा घोळ, ३५ जणांच्या खात्यातून पैसे गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 03:40 IST