शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

दानवे यांचा राजकीय प्रवास सरपंच ते केंद्रीय राज्यमंत्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2019 03:35 IST

२०१४ मध्ये निवडून आल्यानंतर मोदींच्या पहिल्या मंत्री मंडळात राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. परंतु नंतर पक्षाने त्यांच्यावर महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी सोपवली

जालना : सरपंच ते केंद्रीय राज्यमंत्रीपदापर्यंतचा खा. रावसाहेब दानवे यांचा प्रवास सर्वांना थक्क करणारा आहे. मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर आता दुसऱ्यांदा त्यांना केंद्रात राज्यमंत्री म्हणून संधी मिळाली आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि ग्राहक मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून ते जबाबदारी सांभाळणार आहेत.

जालना जिल्ह्यातील जवखेडा (ता. भोकरदन) येथे शेतकरी कुंटुंबात दानवेंचा जन्म झाला. वयाच्या २०व्या वर्षीच ते गावाच्या राजकारणात उतरले. प्रारंभी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच आणि भोकरदन पंचायत समितीचे सभापती झाले. नंतर १९८५ मध्ये त्यांनी विधानसभेची निवडणूक लढविली. परंतु पहिल्यांदाच त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, त्यांनी त्यांची जिद्द सोडली नाही. १९९० मध्ये भोकरदन विधानसभा मतदारसंघातून त्यांना पहिल्यांदा विधानसभेत जाण्याची संधी मिळाली. नंतर युतीच्या काळातही ते आमदार होते. पंचायतराज समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. दानवे पाचव्यांदा लोकसभेत गेले आहेत.

२०१४ मध्ये निवडून आल्यानंतर मोदींच्या पहिल्या मंत्री मंडळात राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. परंतु नंतर पक्षाने त्यांच्यावर महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी सोपवली. त्यात त्यांनी राज्यातील जिल्हा परिषदा, महानगर पालिका तसेच विधासभा, विधान परिषदेच्या पोटनिवडणुकांमध्ये चौफेर यश मिळवून भाजपला राज्यात क्रमांक एकचा राजकीय पक्ष म्हणून नावारूपास आणले.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीpm modi swearing-in ceremonyनरेंद्र मोदी शपथविधी