कामावर जाणाऱ्या युवतीच्या विनयभंग; दोघांना अटक

By Admin | Updated: March 6, 2016 01:13 IST2016-03-06T01:13:52+5:302016-03-06T01:13:52+5:30

एमआयडीसीतील एका कंपनीत कामाला जाणाऱ्या युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. शनिवारी पहाटे ही घटना घडली.

Molestation of women going to work; Both arrested | कामावर जाणाऱ्या युवतीच्या विनयभंग; दोघांना अटक

कामावर जाणाऱ्या युवतीच्या विनयभंग; दोघांना अटक

बारामती : एमआयडीसीतील एका कंपनीत कामाला जाणाऱ्या युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. शनिवारी पहाटे ही घटना घडली.
याप्रकरणी आरोपी उदय राठोड, अरविंद राठोड (रा. चैतन्य हॉटेल परिसर, बारामती) या दोघांना अटक करण्यात आली आहे. संबंधित युवती शनिवारी पहाटे कामावर जाण्यासाठी बसची वाट पाहत उभी होती. या वेळी दोघे आरोपी स्कूटी वरून या ठिकाणी येऊन थांबले. या तरुणीला ‘कोठे जायचे आहे,’ अशी विचारणा केली. त्यावर युवतीने मला उशीर झाला आहे, सोडता का, अशी विचारणा केली. त्यानंतर ते तिघे जण गाडीवर बसून निघाले. मात्र, तीन हत्ती चौकातून गाडी दुसऱ्या रस्त्याने वळविली. या वेळी तरुणीने थांबवा, थांबवा, असे म्हणण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंधाराच्या ठिकाणी नेऊन तिचा या दोघांनी
विनयभंग केला.

Web Title: Molestation of women going to work; Both arrested