अंबोलीतील पबमध्ये तरुणीचा विनयभंग

By Admin | Updated: May 16, 2014 01:06 IST2014-05-16T01:06:07+5:302014-05-16T01:06:07+5:30

आंबोली येथील एस्केप पबमध्ये एका तरुणीचा विनयभंग करणार्‍या दोन तरुणांना गजाआड करण्यात आले. नितीन राजेंद्र तिवारी(३१)आणि जय रमेश रामोलीया (२२)अशी अटक आरोपींची नावे आहेत.

Molestation of a woman in Amboli Pub | अंबोलीतील पबमध्ये तरुणीचा विनयभंग

अंबोलीतील पबमध्ये तरुणीचा विनयभंग

मुंबई : आंबोली येथील एस्केप पबमध्ये एका तरुणीचा विनयभंग करणार्‍या दोन तरुणांना गजाआड करण्यात आले. नितीन राजेंद्र तिवारी (३१) आणि जय रमेश रामोलीया (२२) अशी अटक आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पबमध्ये या दोघांनी या तरुणीशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. त्यास या तरुणीने प्रतिकार केला. तेव्हा या दोघांनी तिच्याशी हुज्जत घातली; तसेच या तरुणीला मारहाणही केली. या घटनेबाबत समजताच आंबोली पोलीस तत्काळ पबमध्ये पोहोचले. तोपर्यंत तेथील बाऊन्सरनी या दोघांना पकडून ठेवले होते. तरुणीच्या तक्रारीनुसार या दोघांविरोधात विनयभंग, मारहाण, अश्लील हावभाव केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला. त्यांना अटकही करण्यात आली. हे दोघेही पेशाने व्यावसायिक असून, नितीन काळबादेवीला तर जय भार्इंदर येथे वास्तव्यास आहे.

Web Title: Molestation of a woman in Amboli Pub