दोन तरुणींचा विनयभंग
By Admin | Updated: January 23, 2017 04:14 IST2017-01-23T04:14:10+5:302017-01-23T04:14:10+5:30
शहरातील राबोडी आणि धर्मवीरनगर या परिसरांत दोन मुलींच्या विनयभंगाच्या घटना घडल्या. या प्रकरणी राबोडी आणि चितळसर-मानपाडा

दोन तरुणींचा विनयभंग
ठाणे : शहरातील राबोडी आणि धर्मवीरनगर या परिसरांत दोन मुलींच्या विनयभंगाच्या घटना घडल्या. या प्रकरणी राबोडी आणि चितळसर-मानपाडा पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले असून, कोणालाही अटक झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
पहिली घटना राबोडीच्या शिवाजीनगर भागात घडली. शनिवारी रात्री १९ वर्षीय तरुणी घरासमोर मैत्रिणीसह शतपावली करीत असताना साहिल चव्हाण याने तिला धक्का दिला, तर सिद्धेश सावंत, जयराज शिर्के आणि स्वप्निल साळुंखे यांनी अश्लील शिवीगाळ करून तिथून पळ काढला. या प्रकरणी तिने राबोडी पोलीस चौघांचाही शोध आहेत.
दुसऱ्या घटनेत धर्मवीरनगर भागात १६ वर्षीय विद्यार्थिनीचा पाठलाग करणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थ्याने २० जानेवारीला स्वामी विवेकानंदनगर, वसंतविहार भागात विनयभंग केल्याचा प्रकार घडला.