प्राध्यापकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग

By Admin | Updated: October 25, 2016 20:33 IST2016-10-25T20:33:47+5:302016-10-25T20:33:47+5:30

महाविद्यालयीन विद्याथीर्नीचा मागील एक वषार्पासून वाईट नजरेने बघुन इशारे करणा-या एका प्राध्यापकाविरोधात विद्यार्थींनीने मोहोळ पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

Molestation of student by professor | प्राध्यापकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग

प्राध्यापकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग

ऑनलाइन लोकमत 

सोलापूर, दि. 25 : मोहोळ येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मागील एक वषार्पासून वाईट नजरेने बघुन इशारे करणा-या एका प्राध्यापकाविरोधात विद्यार्थिनीने मोहोळ पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील २२ वर्षीय तरुणी मोहोळ येथिलच महाविद्यालयात शिक्षण घेत असून १८आॅक्टोबर २०१५ पासून ते २२ आॅक्टोबर २०१६ पर्यंत  प्रा. व्ही. एस. पवार हा संबंधित तरुणीचा पाठलाग करुन तिच्याकड़े वाईट नजरेने बघत इशारे करणे तसेच तिच्या वर्गात जावून तू मला बाहेर एकटी भेट असे सांगून पेपर चालू असताना कोणत्यांना कोणत्या बहान्याने हाताला विनाकारण स्पर्श करणे असे प्रकार करत होता. शिवाय मनास लज्जा उत्पन्न होणारे कृत्य करीत होता. आशा आशयाची फिर्याद पीड़ित तरुणीने मोहोळ पोलिस ठाण्यात दाखल केली असून अधिक तपास सपोनि नजीर खान हे करीत आहेत.


Web Title: Molestation of student by professor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.