युवतीचा पोलिस शिपायांकडून विनयभंग
By Admin | Updated: July 17, 2014 01:29 IST2014-07-17T00:58:00+5:302014-07-17T01:29:39+5:30
वाशिम येथील घटना: तिघांवर गुन्हा दाखल

युवतीचा पोलिस शिपायांकडून विनयभंग
वाशिम : शहरामधील अकोला नाका परिसरात एका २३ वर्षीय युवतीचा दोन पोलिस कर्मचारी व एका इसमाने विनयभंग केला. याप्रकरणी आरोपिंविरूद्ध भादंविचे कलम ३५४, ३४ यासह अँट्रॉसिटी अँक्टनुसार शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर घटना १५ जुलै रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली.
शहरामधील अकोला नाका परिसरात असलेल्या चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या कार्यालयासमोर १५ जुलै रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास एक युवती तिच्या भावासोबत लक्झरीची वाट बघत उभी होती. यावेळी त्याठिकाणी पोलिस शिपाई संतोष राठोड, पोलिस शिपाई दीपक ढोबळे व सचिन सुर्वे हे तिघे बाजूला उभे होते. या तिघांनी लज्जा येईल अशाप्रकारे ईल हातवारे केले. अशा प्रकारची फिर्याद पीडित युवतीने वाशिम शहर पोलिस स्टेशनमध्ये १५ जुलै रोजी रात्री ११ वाजताचे सुमारास दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी उपरोक्त तिघांविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.
*आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी विनयभंग व अँट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील आरोपी संतोष राठोड, दीपक ढोबळे व सचिन सुर्वे यांना पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली होती. या तिघांनाही आज १६ जुलै रोजी वाशिम येथील न्यायालयात हजर केले. न्यायाधिशांनी तिघांनाही १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या तिघांनाही अकोला येथील कारागृहात रवाना करण्यात आले.